शनिवार, 11 जानेवारी 2025
  1. धर्म
  2. सण-उत्सव
  3. श्रावण
Written By

See Video : गटारी का साजरी करतात !

श्रावण महिन्याच्या अगोदर येणारी अमावस्या म्हणजे आषाढी अमावास्येला दिव्याची अमावस्या म्हणतात. अनेक लोकं ही अमावस्या गटारी अमावस्या म्हणून साजिरी करतात. श्रावण महिन्यात अनेक लोकं मांस, मद्य व इतर अनेक पदार्थांचे सेवन वर्ज्य करतात. हा एक महिना सुरू होण्याआधी या पदार्थांचे भरपूर सेवन करण्याची अनेक ठिकाणी परंपरा झाली आहे. या दिवशी भरपूर प्रमाणात मांस-मासे खाणे, दारू पिऊन धुंद होणे अशा प्रकारचे नियोजन केले जाते.
 
श्रावणात मांस व मद्य वर्ज्य करण्याचे कारणं
 
१) या कुंद पावसाळी वातावरणात मांसाहार पचत नाही.
 
२) हा काळ बहुतेक प्राण्यांचा प्रजनन काळ असतो. याच काळात प्राण्यांची हत्या केली तर सार्या  निसर्ग चक्रावरच विपरीत परिणाम होतो. त्यामुळे निसर्गपुत्र कोळी बांधव या काळात मासेमारी करीत नाहीत आणि सरकारी पातळीवरूनही मासेमारीवर बंदी घालण्यात येते.
 
३) बाहेरच्या वातावरणामुळे प्राण्यांच्या शरीरात आणि शरीरावर अनेक घातक जीवजंतू असण्याची शक्यता असते. शिजविताना त्यांचा पूर्ण नाश न झाल्यास त्याचा त्रास सेवन करणार्‍यांनाही होऊ शकतो.
त्यामुळे एकदा याला धार्मिक जोड दिली की आपोआपच निसर्गाचा तोल साधला जातो.
 
अत्यंत दुर्मिळ आणि प्रकृतीला पोषक अशा अनेक भाज्या याच काळात उगवतात. शाकाहारामुळे अशा भाज्या आपोआपच खाल्ल्या जातात.