सोनपावलांनी गौरी आली घरी
मनोभावे करूयात तिचे पूजन
मंगळागौरी व्रताच्या सर्व सख्यांना शुभेच्छा
श्रावणामुळे पसरली हिरवळ
सुंदर दिसे निसर्गाची किमया
मंगळागौरच खेळायची ना
मग चला जमुयात सर्व सख्या.
मंगळागौरी व्रताच्या सर्व सख्यांना शुभेच्छा
झिम्मा फुगडी चा खेळ खेळूया
गौरीच्या स्वागताच्या आनंदाने घर भरुया
मंगळागौरी व्रताच्या खूप शुभेच्छा
पावसाच्या रिमझिम सरींनी
चहूकडे दरवळला मातीचा सुवास
एकमेकींना शुभेच्छा देऊन
साजरी करूयात मंगळागौर खास
मंगळागौरी व्रताच्या सर्व सख्यांना शुभेच्छा
श्रावण मासी साधला ऊन पावसाचा सुंदर मेळ
चला मिळून खेळूया मंगळागौरीचे खेळ
मंगळागौर व्रताच्या सर्वांना शुभेच्छा
सणासुदीची घेऊन उधळण
आला हा हसरा श्रावण
सौभाग्यवती पुजती मंगळागौर
खेळ खेळुनी पारंपरिक थोर
मंगळागौर व्रताच्या शुभेच्छा
हाती कडे पायी तोडे
पैंजनाची रुणझुण
झुम झुम मधूर ध्वनीच्या
नादामध्ये भक्ताघरी
सोनपावलांनी आली गौरी घरी
मंगळागौर व्रताच्या शुभेच्छा
मंगळागौर पुजनानिमित्त
तुम्हाला आणि तुमच्या
परिवाराला मंगळागौर
व्रताच्या हार्दिक शुभेच्छा
ओम सर्वमंगल मांगल्ये शिवे सर्वार्थसाधिके,
शरण्ये त्र्यंबके गौरी नारायणी नमोस्तुते
मंगळागौर व्रताच्या शुभेच्छा
फुगडी खेळा वा झोका कुणी
तर कुणी खेळा मंगळागौर
आला श्रावणमास त्याचा
आनंद घेऊया चौफेर
मंगळागौर व्रताच्या शुभेच्छा
मंगळागौरी माते नमन करते तुला
अखंड सौभाग्य लाभू दे मला
श्रावणाच्या आगमनाने
बहरली कांती..
मंगळागौर पुजनाने मिळो
सर्वांना सुखशांती..
श्रावणात आकाशात कडकडतात विजा
चला सख्यांनो उत्साहाने अरू मंगळागौरीची पुजा
मंगळागौर पुजनाच्या सर्व सख्यांना खूप खूप शुभेच्छा
श्रावण आला, घेऊन सोबत मंगळागौरी
हिंदोळ्या भोवती जमलेल्या पोरी
रुसून बसलेली यादव राणी
सखी संघात गाते मधूर श्रावणगाणी
मंगळागौर पुजनाच्या सर्व सख्यांना खूप खूप शुभेच्छा
नटली श्रावणाची नवलाई
घालू सडा अंगणी चल ताई
सौभाग्यवती पुजती मंगळागौरी
घेईन गरगर गिरक्या मी भवरी
मंगळागौर पुजनाच्या सर्व सख्यांना शुभेच्छा
तिच्या मनी असे एक आशा
होऊ नये तिची निराशा
होवो सर्व इच्छांची पूर्ती
समृद्धी घेऊन आली मंगळागौरी
मंगळागौर पुजनाच्या सर्व सख्यांना शुभेच्छा
श्रावण मासातील पहिल्या मंगळागौरी
पुजनाच्या सर्व सौभाग्यवती भगिनींना
मंगलमय शुभेच्छा,मंगळागौरी तुमच्या
सर्व इच्छा पूर्ण करो हिच सदिच्छा
मंगळागौर पुजनाच्या सर्व सख्यांना शुभेच्छा
सरींचा वर्षाव सणांचा उत्सव
संस्कृती जपायला श्नावण आला
व्रत वैकल्यांचा सण हा आला
झिम्मा फुगडी पारंब्याचे झोके घेत
परंपरेचा सुहास दरवळुनी गेला
मंगळागौर पुजनाच्या सर्व सख्यांना शुभेच्छा
पावसाच्या रिमझिम सरींनी
परंपरेचा सुहास गेला दरवळुनी
मंगळागौर खेळून सांगड घालिती सर्वजणी
मंगळागौर पुजनाच्या सर्व सख्यांना शुभेच्छा
पोरी पिंगा ग पोरी पिंगा ग पोरी पिंगा
तुझ्या पिंग्यानं मला बोलिवली
रात जागवली पोरी पिंगा
मंगळागौर पुजनाच्या सर्व सख्यांना शुभेच्छा
फुगड्या, झिम्मा, भेंड्या खेळती
मैत्रिणी मंगळागौर जागवती मिळूनी साऱ्याजनी
मंगळागौर पुजनाच्या सर्व सख्यांना शुभेच्छा
बांगड्या, पाटल्या अन् तोडे हाती बाजूबंद रेखीव
दंडावरी कानावर डुलती झुमके तालात
मंगळसूत्र सौभाग्याचे अन् ठुशी परंपरेची कंठात
सख्यांसंगे जागवते रात्र खेळ खेळुनी
ही मंगळागौरी…
मंगळागौर पुजनाच्या सर्व सख्यांना शुभेच्छा
मेघ मल्हार रंगातच
श्रावणसर कोसळते…
मंगळागौर पुजनाने
माझे जीवनपुष्प बहरते
मंगळागौर पुजनाच्या सर्व सख्यांना शुभेच्छा
मंगल आरती सोळा वातींची
पुजा करु शिवा सह गौरीची
जय जय मंगळागौरी..
मंगळागौरी आशीर्वाद दे येऊ दे भाग्यभरती
आयुष्याच्या उत्कर्षाची कमान राहू दे चढती
मंगळागौर पुजनाच्या सर्व सख्यांना शुभेच्छा