रविवार, 22 डिसेंबर 2024
  1. धर्म
  2. सण-उत्सव
  3. श्रावण
Written By
Last Modified: शुक्रवार, 26 जुलै 2024 (16:47 IST)

Nag Panchami 2024 यंदा कधी आहे नागपंचमी ? मुहूर्त, पूजा विधी आणि कथा जाणून घ्या

नाग पंचमी सण श्रावण महिन्यात साजरा केला जातो. या दिवशी नाग देवतेची उपासना केल्याने विशेष लाभ प्राप्त होतो आणि जीवनातील सर्व अडथळे दूर होतात.
 
पंचांगानुसार दरवर्षी श्रावण महिन्यातील शुक्ल पक्षाच्या पंचमी तिथीला हा सण साजरा केला जातो. या दिवशी व्रत ठेवण्यात येते. या दिवशी व्रत-पूजा आणि कथा केल्याने सुख-समृद्धी प्राप्ती होते असे मानले जाते.
तर चला जाणून घेऊया की यंदा नागपंचमी सण कधी साजरा केला जाणार आणि नागदेवतेचे पूजा करण्याची पद्धत काय-
 
नाग पंचमी 2024 शुभ मुहूर्त
यंदा नाग पंचमी हा सण 9 ऑगस्ट 2024 रोजी साजरा केला जाणार आहे. नाग पंचमीच्या दिवशी दिवस पूजा करता येईल परंतु विशेष पूजेसाठी दुपारी 12:30 ते 1:00 हा काळ शुभ असेल. या दिवशी प्रदोष काळात नाग देवतेची पूजा करावी. प्रदोष काळ संध्याकाळी 6:10 ते 8:20 पर्यंत राहील.
 
नागाच्या 12 स्वरूपाची पूजा होते
नाग पंचमीच्या दिवशी मातीने निर्मित नागदेवतेची विधीपूर्वक पूजा करावी. या दिवशी नागाच्या 12 स्वरूप अनंत, वासुकी, शेष, पद्मनाभ, कर्कोटक, अश्व, धृतराष्ट्र, शंखपाल, कालीय आणि तक्षक यांचे स्मरण करुन पूजा केली जाते.
 
या प्रकारे करा नाग पूजा
नागपंचमीला पहाटे लवकर उठून स्नान, ध्यान वगैरे करून देवासमोर व्रत करण्याचे संकल्प घ्या.
नागदेवतेचे चित्र किंवा नागदेवतेची मातीची मूर्ती पूजा खोलीत स्वच्छ चौरंगावर स्थापित करा.
यानंतर नागदेवतेला हळद, रोळी, तांदूळ, फुले इत्यादी अर्पण करा. नंतर दूध, तूप आणि साखर एकत्र करून अर्पण करा.
यानंतर पूजेच्या शेवटी नाग पंचमी व्रत कथा ऐका आणि आरतीने पूजेची सांगता करा.
नागपंचमी सणाच्या दिवशी नागदेवतेची पूजा करून त्याला दूध पाजल्यास शाश्वत फळ मिळते, असे म्हणतात.
अस्वीकरण: येथे सादर केलेला मजकूर केवळ माहितीच्या उद्देशाने आहे. वेबदुनिया याला दुजोरा देत नाही. कोणताही सल्ला किंवा माहिती अमलात आणण्यापूर्वी कृपया तज्ञांचा सल्ला घ्या.