testwebdunia1
testwebdunia0
testwebdunia2

Pithori Amavasya 2019 पिठोरी अमावस्या व्रत पूजा विधी

pithori amavasya vrat
पिठोरी अमावस्या विवाहित स्त्रिया आपल्या मुलांसाठी ठेवतात. देशातील अनेक राज्यांमध्ये याला पोळा अमावस्या म्हणून देखील साजरी करतात. पिठोरी अमावस्या व्रताचं महत्त्व आणि त्याबद्दल माहिती सर्वात आधी देवी पार्वती यांनी सांगितले होती. त्यांनी स्वर्गलोकाचेे देव राजा इंद्र यांच्या पत्नीला याबद्दल माहिती दिली होती. देवी पार्वतीने सांगितले होते की हे व्रत केल्याने मुलांच्या जीवनात सुख-समृद्धी राहते. त्यांना शौर्य प्राप्त होतं.
पूजा विधी
या दिवशी सकाळी लवकर उठून पवित्र नदीत स्नान करण्याची परंपरा आहे. असे शक्य नसल्यास पवित्र नदीचं पाणी आपल्या अंघोळीच्या पाण्यात मिसळून स्नान करावे. नंतर सूर्याला अर्घ्य द्यावे. दररोज प्रमाणे देवाची पूजा करावी.
अमावस्या तिथी पितरांची तिथी देखील मानली जाते म्हणून या दिवशी पिंड दान व तरपण करण्याचे देखील महत्त्व आहे.
या दिवशी गरीब आणि गरजू लोकांना चपला, छत्री, शॉल व इतर वस्तू दान करावे.
शक्य असल्यास पुरी भाजी, शिरा तयार करून गरिबांना आणि विशेष करून लहान मुलांना खाऊ घालावा.
या दिवशी 64 देवींची पूजा आराधना केली जाते. या दिवशी आपल्या कुटुंबाची आणि मुलांच्या समृद्धीची प्रार्थना केली जाते. त्यांना दीर्घायू प्राप्त हो अशी प्रार्थना करावी.
या दिवशी क‍णकेने देवी प्रतिमा तयार करून पूजा करावी. आपल्या आवडीप्रमाणे त्यांना रंग देणे, सजवणे, वस्त्र परिधान करवणे हे देखील करता येऊ शकतं.
काही क्षेत्रांमध्ये देवी दुर्गेला योगिनी रूपात पुजतात. म्हणून प्रत्येक देवी अर्थात 64 योगिनींची पूजा केली जाते. या सर्व मुरत्या एका चौरंगावर किंवा पाटावर मांडाव्या.
त्यांना दागिने घालायचे असल्यास बेसनच्या पिठाचे दागिने तयार करावे. सवाष्णीचे सर्व दागिने तयार करून देवीला सजवावे.
अलीकडे त्यांची छापील चित्रे मिळतात.
पूर्ण विधिपूर्वक पूजा झाल्यावर आरती करावी. देवीला नैवेद्य दाखवावा.
व्रतात नैवेद्यासाठी पिठाचेच सर्व पदार्थ करावे. बेदाणे घातलेली भाताची खीर हा ‘पिठोरी’चा खास नैवेद्य.
खिरीच्या वाटीवर पुरी झाकून आईने ते डोक्यावर घेऊन ‘अतिथी कोण? असा प्रश्न विचारावा. मुलांनी ‘मी आहे’ असे म्हणून ते पक्वान्न मागच्या बाजूने काढून घ्यावे.
या दिवशी सप्तमातृका पूजा देखील केली जाते. शिव आणि शक्ती यांच्याद्वारे उत्पन्न 7 दिव्य माता ज्यांचे नावे ब्राह्मणी, वैष्णवी, महेश्वरी, कुमारी, वाराही, इंद्राणी, चामुंडी असे आहेत त्यांची पूजा केली जाते. नंतर शिवाद्वारे शक्ती योगेश्वरी उत्पन्न झाली. या देवीला आठवे स्थान प्राप्त झाले. म्हणून पिठोरी अमावास्येला 64 योगिनी आणि सप्तमातृकेची पूजा केली जाते.
पिठोरी अमावस्या व्रत केल्याने मुलं स्वस्थ, बुद्धिमान आणि शौर्यवान बनतात.


यावर अधिक वाचा :

राशिभविष्य

येथे श्राद्ध केल्याने पितरांच्या आत्म्याला शांती मिळते

येथे श्राद्ध केल्याने पितरांच्या आत्म्याला शांती मिळते
श्राद्धाचं अर्थ आपल्या देवता, पितर आणि वंशाप्रती श्रद्धा प्रकट करणे. हिंदू मान्यतेनुसार ...

21 सप्टेंबर 2019 दिवाळीपेक्षाही शुभ महालक्ष्मी व्रत, या ...

21 सप्टेंबर 2019 दिवाळीपेक्षाही शुभ महालक्ष्मी व्रत, या प्रकारे करा पूजन
आज महालक्ष्मी पर्व अर्थात गजलक्ष्मी व्रत आहे. हा दिवस दिवाळीपेक्षा देखील शुभ मानले गेला ...

Navratri 2019 Ghat Sthapna Muhurat : घटस्थापना शुभ मुहूर्त

Navratri 2019 Ghat Sthapna Muhurat : घटस्थापना शुभ मुहूर्त
आश्विन शुक्ल पक्षाच्या प्रतिप्रदेपासून शारदीय नवरात्र 29 सप्टेंबर रविवार रोजी सुरू होत ...

पितृपक्ष 2019: 3 संख्या अती महत्त्वाची

पितृपक्ष 2019: 3 संख्या अती महत्त्वाची
धर्मशास्त्रांप्रमाणे पितरांचे पितृलोक चंद्राच्या उर्ध्वभागात असल्याचे मानले गेले आहे. ...

नवरात्री 2019: मधुमेह रुग्णांसाठी धोकादायक आहे का उपास

नवरात्री 2019: मधुमेह रुग्णांसाठी धोकादायक आहे का उपास करणे?
नवरात्रीमध्ये नऊ दिवस उपास करण्याची तयारी करत असणार्‍यांनी सर्वात आधी आपल्या आरोग्याची ...

देवेंद्र फडणवीस यांच्या '5 वर्षांत भ्रष्टाचाराचा आरोप नाही' ...

देवेंद्र फडणवीस यांच्या '5 वर्षांत भ्रष्टाचाराचा आरोप नाही' या वक्तव्याचा नेमका अर्थ काय?
"पाच वर्षं प्रामाणिकपणे काम केलं. आमच्यावर एकदाही भ्रष्टाचाराचा आरोप राज्यात झाला नाही," ...

उद्धव ठाकरे: विधानसभा निवडणूक 2019 आधी कदाचित मी आयोध्येला ...

उद्धव ठाकरे: विधानसभा निवडणूक 2019 आधी कदाचित मी आयोध्येला जाणार
विधानसभा निवडणुकांआधी कदाचित मी आयोध्येला जाईन, असं वक्तव्य शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ...

दुर्दैवी, घराची भिंत कोसळून एकाच घरातील गर्भवती महिलेसस ...

दुर्दैवी, घराची भिंत कोसळून एकाच घरातील गर्भवती महिलेसस दोघांचा मृत्यू
बुलढाणा जिल्ह्यात दुर्दैवी घटना घडली आहे. या घटनेत घराची भिंत कोसळून एकाच कुटुंबातील ...

राज ठाकरे यांनी महत्त्वाची बैठक पार पडली

राज ठाकरे यांनी महत्त्वाची बैठक पार पडली
अखेर मनसेने निवडणुकीचे बिगुल फुंकले, लढवणार विधानसभा महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीच्या ...

SBI अलर्ट: एसबीआय ग्राहकांसाठी वाईट बातमी, मागे घेतला हा ...

SBI अलर्ट: एसबीआय ग्राहकांसाठी वाईट बातमी, मागे घेतला हा मोठा फायदा
देशातील सर्वात मोठी पब्लिक सेक्टर बँक स्टेट बँक ऑफ इंडिया (SBI) ने रेपो रेट लिंक्ड आधारित ...