suvichar
✕

Love Marriage करायची असल्यास Shravan मध्ये हे उपाय करा

Updated: मंगळवार, 25 जुलै 2023 (14:49 IST)
 
अविवाहित मुलींनी योग्य वर मिळण्यासाठी भगवान शंकराची पूजा केली तर विवाहित स्त्रिया वैवाहिक जीवनात सुखासाठी आणि संततीप्राप्तीसाठी भगवान शंकराची पूजा करतात. अनेक मुली मनाप्रमाणे किंवा योग्य नवरा मिळावा म्हणून श्रावण सोमवारपासून सोळा सोमवार उपवास करतात. असे मानले जाते की सोळा सोमवारी उपवास केल्याने मुलींना चांगला वर मिळतो. या दिवशी भगवान शिवाची पूजा विधीपूर्वक केल्यास जीवनातील संकटांपासून मुक्ती मिळते.
 
श्रावण सोमवारी पूर्ण भक्तिभावाने भगवान शिवाची पूजा केल्यास भगवान शिव त्या भक्तावर प्रसन्न होऊन भक्तांच्या सर्व मनोकामना पूर्ण करतात. जर एखाद्याला प्रेमविवाह करण्यात अडचणी येत असतील तर त्यांनी श्रावण महिन्यात भगवान शिवाची पूजा करण्यासोबतच काही विशेष उपाय करावेत, तर भगवान शिव त्याला इच्छित वर मिळण्यासाठी आशीर्वाद देखील देतात. विशेष पूजा केल्याने विवाहात येणारे अडथळेही दूर होतात आणि विवाहाची शक्यताही लवकर निर्माण होते.
 
श्रावण सोमवारी हे उपाय करावे
लग्नाला उशीर होत असेल तर मातीपासून 108 पार्थिव शिवलिंग बनवावे. सुपारीच्या पानावर लवंग आणि वेलची ठेवून भगवान शंकराला अर्पण करावी. यानंतर ओम गौरी शंकराय नमः, ओम पार्वतीपतये नमः ची माळ जपावी. ही पूजा केल्यानंतर दुसऱ्या दिवशी शिवलिंग नदीत विसर्जित करावे. असे मानले जाते की हा उपाय केल्याने इच्छित जीवनसाथी मिळतो.
 
प्रेम विवाह साठी उपाय
जर कोणत्याही तरुण किंवा तरुणीला प्रेमविवाह करण्यात अडचणी येत असतील तर प्रदोष काळात भगवान शिव आणि माता पार्वतीची पूजा करावी. या पूजेत सर्व 16 शृंगार सामग्री देवी पार्वतीला अर्पण कराव्यात. शिव-पार्वतीच्या मूर्तीसमोर किंवा फोटोसमोर बसून 'ओम श्री वर प्रदाय श्री नमः' या मंत्राचा जप करावा. यानंतर सुपारीच्या पानांसह सिंदूर अर्पण करावं. असे केल्याने प्रेमविवाहात येणाऱ्या अडचणी दूर होतात.
 
अविवाहित तरुणींसाठी उपाय
जर मुलीच्या लग्नात अडथळे येत असतील तर श्रावण सोमवारी संध्याकाळी शिव-पार्वतीच्या मूर्तीवर सात वेळा मौली बांधा. यानंतर शिव-पार्वती यांचे बंधन करवावे. मुलीच्या हाताने हा उपाय केल्याने विवाह लवकर होतो. विवाहयोग्य मुलीने असे केल्यास तिला भगवान शंकरासारखा पती प्राप्त होतो.

अस्वीकरण (Disclaimer) : औषध, आरोग्य टिप्स, योग, धर्म, ज्योतिष इत्यादी विषयांवर वेब जगतात प्रकाशित/प्रसारण केलेले व्हिडिओ, लेख आणि बातम्या फक्त तुमच्या माहितीसाठी आहेत. वेबदुनिया याला दुजोरा देत नाही. या संबंधी कोणताही प्रयोग करण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला घ्या.

सर्व पहा

दिवाळीच्या आधी फ्रीज कसा व्यवस्थित लावावा? पदार्थ टिकवण्यासाठी योग्य नियोजन

हनुमानजी आजही जिवंत आहेत का? ते अमर कसे झाले? जाणून घ्या पौराणिक सत्य!

Vasubaras 2026 Wishes in Marathi वसुबारस शुभेच्छा संदेश मराठी

अमावस्येच्या रात्री शारीरिक संबंध ठेवू नयेत, असे का म्हटले जाते?

दिवाळीत गर्दी टाळून फिरायचे आहे? पर्यटनस्थळ निवडताना या टिप्स वापरा

सर्व पहा

Diwali 2026 दिवाळी तारखा, मुहूर्त: वसुबारस, धनत्रयोदशी, नरक चतुर्दशी, लक्ष्मी पूजन, पाडवा आणि भाऊबीज महत्तवाची माहिती

मूलांक ८ असलेल्यांनी सावध राहा! 'या' तारखांना जन्मलेल्या व्यक्तीशी विवाह टाळावा, तुटू शकते नाते!

दिवाळीच्या फराळात गोड आणि तिखट पदार्थांचे योग्य प्रमाण कसे ठरवावे?

महागड्या क्रीम्सना म्हणा बाय-बाय! हिवाळ्यात कोरड्या त्वचेसाठी अत्यंत स्वस्त आणि नैसर्गिक उपाय

गरम जेवण लगेच फ्रिजमध्ये ठेवावे की थंड झाल्यावर? अन्न टिकवण्याची योग्य पद्धत व नियम

पुढील लेख
Show comments