शनिवार, 24 फेब्रुवारी 2024
  1. धर्म
  2. हिंदू
  3. हिंदू धर्माविषयी
Written By
Last Modified: शनिवार, 15 जुलै 2023 (07:17 IST)

आज शनिचे प्रदोष व्रत... राशीनुसार दान करा, होतील सर्व काम!

Shani Pradosh Vrat  हिंदू कॅलेंडरनुसार वर्षातील प्रत्येक महिन्यात प्रदोष व्रत पाळले जाते. प्रत्येक महिन्यात दोन प्रदोष व्रत असतात, एक शुक्ल पक्षात आणि दुसरा कृष्ण पक्षात. धार्मिक मान्यतेनुसार जो कोणी खऱ्या मनाने प्रदोष व्रत ठेवतो त्याच्या सर्व मनोकामना भगवान शंकर पूर्ण करतात.  हा प्रदोष व्रत विशेष आहे कारण हा दिवसही शनिवार आहे.
 
 या दिवशी पूजा आणि उपवास केल्यास भगवान शिव आणि शनिदेव या दोघांचे आशीर्वाद एकाच वेळी मिळू शकतात. शनि प्रदोष व्रत करणाऱ्या व्यक्तीची प्रत्येक इच्छा पूर्ण होते. जर एखाद्या व्यक्तीने या दिवशी आपल्या राशीनुसार दान केले तर सुख-समृद्धीसोबतच दुःखापासूनही मुक्ती मिळते.
 
प्रदोष व्रताच्या दिवशी राशीनुसार दान करा
मेष : शनि प्रदोषाच्या दिवशी या राशीच्या लोकांनी छत्री दान करणे योग्य राहील. यामुळे शनि आणि शिव दोघांचाही आशीर्वाद मिळेल.
वृषभ : या राशीच्या लोकांनी शनि प्रदोषाला काळ्या वस्त्रांचे दान करावे. खूप फायदा होईल.
मिथुन : या राशीच्या लोकांसाठी शनि प्रदोष व्रताच्या दिवशी मोहरीचे तेल दान करणे शुभ मानले जाते.
कर्क : या राशीच्या लोकांनी गरजू असहाय लोकांना कपडे दान करावे.
सिंह राशी: शनि प्रदोष व्रताच्या दिवशी या राशीच्या लोकांनी अन्न आणि वस्त्र दान करावे.
कन्या : या राशीच्या लोकांसाठी ब्लँकेट आणि काळी छत्री दान करणे शुभ मानले जाते.
तूळ : या राशीच्या लोकांसाठी मोहरीचे तेल किंवा तिळाचे तेल दान करणे योग्य राहील.
वृश्चिक : शनि प्रदोष व्रताच्या दिवशी या राशीच्या लोकांसाठी लोखंडी भांडी किंवा काळे वस्त्र दान करावे.
धनु : या राशीच्या लोकांसाठी काळी छत्री किंवा चामड्याचे जोडे दान करावेत.
मकर : या राशीच्या लोकांनी गरजू लोकांना काळी मसूर, काळे तीळ किंवा कपडे दान करावे.
कुंभ : शनि प्रदोष व्रताच्या दिवशी या राशीच्या लोकांनी शनिदेवाची पूजा नियमानुसार करावी. मसूर आणि काळे तीळ दान करावे.
मीन: शनि प्रदोषाच्या दिवशी या राशीच्या लोकांना पांढरे वस्त्र आणि पांढरे फूल दान करणे शुभ मानले जाते.