सोमवार, 23 डिसेंबर 2024
  1. लाईफस्टाईल
  2. करिअर
  3. करिअर मार्गदर्शन
Written By
Last Modified: बुधवार, 5 जुलै 2023 (14:07 IST)

ITI Admission Schedule 2023 Timetable : आयटीआयसाठी प्रवेश जाणून घ्या पूर्ण प्रक्रिया व अंतिम तारीख

ITI Admission
R S
ITI Admission Schedule 2023 Timetable औद्योगिक प्रशिक्षण संस्थांमधील प्रवेश प्रक्रिया दिनांक 12 जून 2023  पासून सुरू करण्यात आलेली असून दहावी उत्तीर्ण अथवा अनुत्तीर्ण इच्छुक विद्यार्थ्यांनी admission.dvet.gov.in  या संकेतस्थळावर जाऊन दिनांक 11 जुलै 2023 पर्यंत ऑनलाईन पद्धतीने प्रवेश अर्ज सादर करावेत. औद्योगिक प्रशिक्षण संस्थेमध्ये प्रवेश घेण्यासाठी तयार करण्यात आलेल्या प्रमाणित कार्यपद्धतीची माहिती पुस्तिका ऑनलाईन स्वरूपात संकेतस्थळावर उपलब्ध करून देण्यात आलेली आहे.
 
अर्ज नोंदवून झाल्यावर उमेदवारांनी नजीकच्या औद्योगिक प्रशिक्षण संस्थेमध्ये जाऊन आपला अर्ज निश्चित करावा व त्यानंतर विकल्प सादर करावे. प्रवेश प्रक्रियेच्या विविध टप्यांबाबत औद्योगिक प्रशिक्षण संस्थांमध्ये समुपदेशन करण्यात येत आहे. यामध्ये उमेदवारांना विविध व्यवसाय अभ्यासक्रमांची माहिती देण्यात येते.
 
औद्योगिक प्रशिक्षण संस्थांमध्ये राज्यभरात एकूण 85 व्यवसाय उपलब्ध असून 154932 एवढ्या जागा प्रवेशासाठी उपलब्ध आहेत. येणाऱ्या कालावधीत औद्योगिक प्रशिक्षण संस्थांमध्ये जादा मागणीचे तसेच आधुनिक तंत्रज्ञानावर आधारित 652 नवीन अभ्यासक्रमाच्या तुकड्या सुरू करण्याचे प्रस्तावित आहे. जागतिक बँकेच्या सहकार्याने औद्योगिक प्रशिक्षण संस्थांचे आधुनिकीकरण करण्यात येत आहे. तसेच आयटीआय प्रवेशित उमेदवारांना प्रतिमाह देण्यात येणाऱ्या विद्यावेतनात वाढ करण्याचे प्रस्तावित करण्यात आलेले आहे. विविध प्रवर्गाच्या उमेदवारांसाठी प्रशिक्षण शुल्क प्रतिपूर्ती योजनाही लागू करण्यात आलेली आहे. दहावी अनुत्तीर्ण विद्यार्थ्यांना आयटीआय अभ्यासक्रम पूर्ण केल्यानंतर नियमानुसार दहावी उत्तीर्ण समकक्षता प्रदान करण्यात येते तर दहावी उत्तीर्ण विद्यार्थ्यांना आयटीआय अभ्यासक्रम पूर्ण केल्यानंतर नियमानुसार बारावी उत्तीर्ण समकक्षता प्रदान करण्यात येते. तरी दहावी उत्तीर्ण अथवा अनुत्तीर्ण विद्यार्थ्यांना आयटीआयतून व्यावसायिक शिक्षण पूर्ण करून त्वरित रोजगार, स्वयंरोजगार अथवा उच्च शिक्षणाच्या संधी प्राप्त होण्यासाठी आयटीआयमध्ये प्रवेश घ्यावे, असे आवाहन व्यवसाय शिक्षण व प्रशिक्षण संचालनालयाकडून करण्यात आले आहे.
 
वेबसाईटवर अधिक माहिती उपलब्ध: कम्प्युटर हार्डवेअर, नेटवर्क टेक्न एरोनॉटिकल ट्रस्ट, स्ट्रक्चर अँड इक्विपमेंट फिटर, ड्रोन टेक्निशियन, पेंटर जनरल मेक मेकॅनिक, ऑटो बॉडी रिपेयर मेकॅनिक, ऑटो बॉडी पेंटिंग, कंप्यूटर प्रोग्रामिंग असे एकूण 83 अभ्यासक्रम यंदा उपलब्ध आहेत. एरोनॉटिकल, कम्प्युटरची निगडित काही विषयांवर यंदा अधिक भर देण्यात आलेला आहे. कारण विद्यार्थ्यांचा कल गेल्या काही वर्षात याकडे दिसत आहे. विद्यार्थ्यांनी अधिक तपशीलवार माहितीसाठी शासनाच्या अधिकृत संकेतस्थळावर भेट द्यावी, असे अवाहन करण्यात येणार आहे.
 
राज्यातील 418 शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्थांमध्ये 95 हजार 380 आणि 574 खासगी ‘आयटीआय’मध्ये 59हजार 12 जागांवर विद्यार्थ्यांना प्रवेश (मुलींसाठी एकूण 53 हजार 600 जागा राखीव) मिळणार आहे. 12 जूनपासून प्रवेश प्रक्रियेला सुरवात होणार असून 1 सप्टेंबरपर्यंत प्रवेशाचे टप्पे पूर्ण होतील, असे नियोजन करण्यात आले आहे.
 
आवश्यक कागदपत्रे :
 शाळा सोडल्याचा दाखला, दहावीची गुणपत्रिका, जातीचा दाखला, उत्पन्नाचा दाखला, नॉन क्रिमिलेअर प्रमाणपत्र, दिव्यांग/सैन्यदल/अल्पसंख्यांक प्रमाणपत्र, आधारकार्ड, पासपोर्ट फोटो, इत्यादी.
 
दहावीनंतर पुढे शिकून तर कोठे सरकारी नोकरी लागणार आहे, असा भविष्याचा विचार करून अनेकजण ‘आयटीआय’कडे वळत असल्याची वस्तुस्थिती आहे. आता अकरावीसह तंत्रनिकेतनचे (अभियांत्रिकी डिप्लोमा) देखील प्रवेश सुरु आहेत. त्यामुळे कोणत्या प्रवेशाला विद्यार्थ्यांची पसंती सर्वाधिक राहिली, विद्यार्थ्यांचा कल काय आहे हे ऑगस्टमध्ये स्पष्ट होणार आहे.
ITI Admission Schedule 2023 Timetable
 
ITI प्रवेशाचे वेळापत्रक
ऑनलाइन अर्जाची सुरवात : 12 जून ते 11 जुलै
पहिल्या फेरीसाठी संस्था पसंतीक्रम : 19 जून ते 12 जुलै
अंतिम गुणवत्ता यादी प्रसिद्ध : 16 जुलै
पहिली प्रवेश फेरी : 20 जुलै
द्वितीय प्रवेश फेरी : 31 जुलै
दुसऱ्या यादीनुसार प्रवेश : 1 ते 4 ऑगस्ट
तिसरी प्रवेश फेरी : 9 ऑगस्ट
चौथी प्रवेश फेरी : 20 ऑगस्ट 
Edited by : Ratnadeep Ranshoor