शनिवार, 11 जानेवारी 2025
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: मंगळवार, 26 जुलै 2022 (10:56 IST)

Class 11 Online Admission:ऑनलाइन अकरावी प्रवेश प्रक्रियेचे सविस्तर वेळापत्रक आज जाहीर

शुक्रवारी ‘सीबीएसई’चा निकाल जाहीर झाल्यामुळे अकरावी प्रवेशाचे पुढील वेळापत्रकही आज जाहीर करण्यात येणार आहे. सीबीएससी आणि महाराष्ट्र बोर्डाच्या उत्तीर्ण विद्यार्थ्यांना आजपासून राज्यभरातून अकरावीच्या प्रवेश साठी अर्ज करता येणार आहे.  

अकरावी वर्गात प्रवेश घेण्यासाठी विद्यार्थ्यांना घरी बसल्या मोबाईल फोन किंवा लॅपटॉप ने ऑनलाईन अकरावीत प्रवेश मिळवता येईल. तरी वेळापत्रकानुसार विद्यार्थांनी अर्ज भरण्याच्या सुचना प्रशासनाकडून देण्यात आल्या आहेत.अर्ज करण्यासाठी विद्यार्थ्याकडे दहावी वर्गाच्या गुणपत्रिकेची ऑनलाईन कॉपी असणं अनिवार्य असणार आहे. तरी विद्यार्थ्यांनी या बाबींची नोंद घ्यावी अशा सुचना प्रशासनाकडून देण्यात आल्या आहेत.मुंबई , नाशिक , पुणे सह आणखी पाच महापालिका क्षेत्रातील विद्यार्थी आजपासून अर्ज दाखल करु शकणार आहेत.