गुरूवार, 26 डिसेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. आयटी जगत
  3. आयटीच्या जगात
Written By

चॅटबॉटसाठी 90 टक्के कर्मचाऱ्यांना घरचा रस्ता, भारतीय कंपनीच्या सीईओचा निर्णय वादात

आधीच नोकऱ्यांचं संकट असताना एखाद्या कंपनीचा सीईओ त्याच्या 90 टक्के कर्मचाऱ्यांना काढत असेल आणि त्याच्या जागी चॅटबॉटला कामाला लावत असेल तर प्रतिक्रिया येणं स्वाभाविक आहे.
 
त्यावर टीका होणं स्वाभाविक आहे आणि ती होतेसुद्धा आहे.
 
भारतातल्या ‘दुकान’ या स्टार्टअपचे संस्थापक सुमित शाह सध्या याच चर्चेचा केंद्रबिंदू झाले आहेत.
 
इतकंच नाही तर सुमित शाह यांनी ट्विटरवर घोषणा केली आहे की चॅटबॉटमुळे त्यांच्या ग्राहकांना मिळणारी उत्तरं लवकर मिळायला लागली आहेत आणि त्यामुळे आधीपेक्षा वेळ कमी लागतो.
 
मात्र ट्विटरवर या निर्णयामुळे मोठा गहजब झाला आहे.
 
आर्टिफिशियल इंटेलिजन्स
लोकांच्या नोकऱ्या कृत्रिम बुद्धिमत्ता म्हणजे आर्टिफिशियल इंटेलिजन्समुळे धोक्यात आहेत. विशेषत: सेवा क्षेत्र .
 
सुमित शाह यांनी काही ट्विट्स केले आहेत. त्यात त्यांनी चॅटबॉटचा वापर करण्याच्या त्यांच्या कंपनीच्या निर्णयाबाबत लिहिलं आहे.
 
मात्र नोकरकपातीचा निर्णय कठीण होता पण तितकाच गरजेचा होता असं ते म्हणाले आहेत.
 
ते म्हणतात, “अर्थव्यवस्थेची परिस्थिती पाहता स्टार्ट अपला युनिकॉर्न व्हायचं आहे अशा वेळी ते नफ्याला आधी महत्त्व देतात आणि आम्ही तेच करत आहोत.”
 
एक अब्ज डॉलर व्हॅल्युएशन असलेल्या कंपनीला युनिकॉर्न म्हटलं जातं.
 
तात्काळ समाधान
सुमित शाह यांनी स्पष्टीकरण दिलं आहे की कस्टमर सपोर्टच्या आघाडीवर त्यांची कंपनी बऱ्याच काळापासून संघर्ष करत होती आणि त्यांना ही परिस्थिती सुधारायची होती.
 
कस्टमर सपोर्टसाठी बॉट आणि AI प्लॅटफॉर्म निर्माणासाठी इतका वेळ कसा लागला, त्याची माहिती सुमित शाह यांनी दिली आहे.
 
त्यांनी सांगितलं की, या निर्णयानंतर ग्राहकांकडे त्यांचा एक AI असिस्टंट असेल.
 
त्यांचं म्हणणं आहे ती चॅटबॉट प्रत्येक प्रश्नाचं योग्य आणि लवकरात लवकर उत्तर देतो.
 
सुमित शाह लिहितात, “प्रत्येक गोष्टीचं तात्काळ समाधान मिळण्याच्या या काळात एखादा नवीन व्यापार सुरू करणं फार काही मोठी गोष्ट राहिलेली नाही. तुमच्याकडे चांगली आयडिया असेल, चांगली टीम असेल, तर कोणीही चांगला बिझनेस करू शकतं.”
 
‘कठोर निर्णय’
दुकान स्टार्टअपने म्हटलं आहे की, त्यांची कंपनी वेगवेगळ्या रोल्ससाठी कर्मचाऱ्यांची भरती करत आहे.
 
मात्र सुमित शाह यांच्या निर्णयानंतर त्यांच्यावर टीकासुद्धा होचत आहे.
 
या कठोर निर्णयामुळे कर्मचाऱ्यांच्या वैयक्तिक आयुष्यात अडचणी वाढल्या असल्याचा आरोप त्यांनी केला आहे.
 
ट्विटरवर एक युझरने विचारलं, “अपेक्षेप्रमाणे त्यांनी नोकरीवरून काढलेल्या 90 टक्के लोकांचा काहीही उल्लेख केलेला नाही. त्यांना आपोआप मदत मिळते आहे का?”
 
आणखी एक युझर लिहितात, “ व्यवसाय म्हणून निर्णय घेतला असेल तर ठीक आहे, मात्र त्यात साजरं करण्यासारखं काहीही नाही.”
 
चॅटजीपीटी
एका ट्विटला रिप्लाय देताना सुमित शाह लिहितात, “एखादी व्यक्ती दुसऱ्या व्यक्तीसाठी दुखावणार याची अपेक्षा होतीच.”
 
कर्मचाऱ्यांच्या मदतीसाठी त्यांनी काय केलंय यावर ते लिंक्डईनवर लिहितील कारण ट्विटरवर लोकांना फक्त फायदा हवा असतो, सहानुभूती नाही.
 
गेल्या काही वर्षात कृत्रिम बुद्धिमत्तेचा वापर वाढला आणि लोकांपर्यंत ते पोहोचतंय.
 
या संसाधनांचा खर्च कमी करण्यासाठी वापर केला जात आहे अशा आशयाचे अनेक अहवाल प्रसिद्ध झाले आहेत.
 
कर्मचाऱ्यांना कायम नोकरी गमावण्याची कायम भीती असते.
 
मार्च महिन्यात गोल्डमन सॅच ने एक अहवाल प्रकाशित केला होता. त्यात म्हटलं होतं की कृत्रिम बुद्धिमत्तेमुळे 30 कोटी पूर्णवेळ नोकऱ्या संपणार आहेत.
 
भारतात अनेक कंपन्या त्यांच्या उत्पादनांच्या निर्मितीसाठी कृत्रिम बुद्धिमत्तेत गुंतवणूक करत आहे त्यामुळे अनेक नोकऱ्या जाण्याचा धोका आहे.