शनिवार, 11 जानेवारी 2025
  1. धर्म
  2. सण-उत्सव
  3. श्रावण
Written By वेबदुनिया|

श्रावणात महादेवाला पांढर्‍या वस्तू अर्पित कराव्या

श्रावणाचा संपूर्ण महिना महादेवाला समर्पित असतो पण श्रावणाच्या पहिल्या सोमवारी महादेवाची पूजा केल्याने विशेष फलांची प्राप्ती होते. सोमवारचे व्रत सूर्योदयापासून सुरू होऊन सायंकालापर्यंत असते. 

शिव पूजा: श्रावण महिन्यात पार्थिव शिवलिंगाच्या पूजेचे फार महत्त्व आहे. पार्थिव शिवलिंगाची पूजा दर सोमवारी आणि प्रदोषच्या दिवशी केल्याने महादेव नक्कीच प्रसन्न होतात. जर पार्थिव शिव लिंग नसतील तर शिव परिवाराच्या मूर्तीला पंचामृताने अंघोळ घालून गंध, फूल, बिल्व पत्र, रोली, वस्त्र अर्पित करावे. महादेवाला पांढर्‍या वस्तू जसे पांढरे फूल, पांढरे वस्त्र आणि पांढर्‍या रंगांचे पक्वान्न विशेष करून अर्पित केले पाहिजे ज्याने तुमच्यावर येणारे सर्व संकट टळतात. महादेवासोबत पार्वती आणि गणपतीचे पूजेचे देखील महत्त्व आहे. गणपतीला दूर्वा, सिंदूर, गूळ आणि पिवळ्या रंगाचे वस्त्र अर्पित करावे व मोदक/लाडूचा प्रसाद दाखवावा. श्रावण सोमवारचे व्रत नवरा बायको दोघेही करू शकतात.