श्रावणाचे स्वागत...!
आषाढा चे काळे मेघ,निरोप घेत होते,
श्रावणाच्या कानात, थांबून काही सांगत तर नव्हते?
कुजबुजलेलं बघितलं मी, दोघांनाही एक क्षण,
श्रावणास आतुरले होते ना सारे जण!
कारण श्रावण आहेच तसा अनोखा न्यारा,
खट्याळ अल्लड तरीही सर्वांना प्यारा,
खूपच काही देऊन जातो तो भरभरून,
ऊन सावलीशी खेळतो तो, लहान होऊन,
वाऱ्याशी पण त्याची दोस्ती होते चटकन,
डोंगर माथ्यावर भटकंती असते त्याची पण!
नववधू ही होते व्याकुळ, माहेरच्या आठवणीत,
निरोप धाडतो श्रावण त्यांचाही एका घडीत,
असा हा जादूगार , फारच प्रिय आहे सर्वांना,
स्वागतास त्याच्या तुम्ही ही तयार आहात ना?
..अश्विनी थत्ते.