1. धर्म
  2. »
  3. सण-उत्सव
  4. »
  5. श्रावण
  6. पंचारति ओवाळू सदया सर्वेशा

hravan Mahina Marathi | पंचारति ओवाळू सदया सर्वेशा

WD
जय देव जय देव श्रीमंगेशा।

पंचारति ओवाळू सदया सर्वेशा ।।धृ।

सदया सगुणा शंभो अजिनांबरधारी।

गोरीरमणा आद्या मदनांतकारी।।

त्रिपुरारी अधहारी शिवमस्तकधारी।

विश्वंभर विरुदे हें नम संकट धारीं ।।जय ।।1।।

भयकृत भयनाशन ही नामें तुजे देवा।

वि‍बुधादिक कमळासन वांछिती तव सेवा।।

तुझे गुण वर्णाया वाटतसे हेवा।

अभिनव कृपाकटाक्षें मतिउत्सव द्यावा ।।जय।।2।।

शिव शिव जपता शिव तूकरिसी निजदासा।

संकट वारी मम तूं करी शत्रुविनाशा।।

कुळवृद्धीते पाववी हीच असे आशा।

अनंतसुत वांछितसे चरणांबुजलेशा ।।जय।।3।।

About Writer
वेबदुनिया
वेबदुनियाच्या न्यूज डेस्क येथे आमचे वार्ताहर, विश्वसनीय स्रोत आणि अनुभवी पत्रकार यांनी तयार केलेले प्रत्यक्ष घटनास्थळावरील अहवाल, विशेष वृत्तांत, मुलाखती आणि रिअल-टाइम अपडेट्स प्रकाशित करण्यापूर्वी वरिष्ठ संपादकांकडून अत्यंत काटेकोरपणे तपासून घेतली जातात..... आणखी वाचा