सिंगाडा-शेंगदाणा स्क्वेयर
साहित्य : 100 ग्रॅम सिंगाडा पीठ, 250 ग्रॅम शेंगदाण्याचे कूट, 100 ग्रॅम खवा, 300 ग्रॅम साखर, 1 चमचा इलायची पूड, 3 थेंब केवडा इसेंस, सजविण्यासाठी चांदीवर्ख.कृती : सिंगाड्याच्या पीठाला कढाईत परतून घ्या. साखरेचा दोन तारी पाक करून त्या दाण्याचे कूट, सिंगाड्याचे पीठ, खवा, इलायची पूड व केवड्याचे इसेंस टाकून मिसळावे. एका ताटाला थोडं तूप लावून त्यावर हे पीठ टाकावे व वरून चांदीवर्ख लावावा. थोडे गार झाल्यावर वड्या कापाव्यात.