शुक्रवार, 22 नोव्हेंबर 2024
  1. धर्म
  2. शीख
  3. शिखांचे सण
Written By

बैसाखी

बैसाखीपासून शीख लोकांच्या नववर्षास सुरवात होते. बैसाखी शक्यतो चौदा ते पंधरा एप्रिलच्या दरम्यान येते. या महिन्यापासूनच ते पेरणीस सुरवात करतात. 1699 साली याच दिवशी शीखांचे दहावे गुरू गोविंदसिंग यांनी 'खालसा' पंथाची स्थापना केली होती.

यासंदर्भात एक कथा प्रसिद्ध आहे. एकदा गुरू गोविंदसिंग यांनी आपल्या अनुयायांपुढे जाऊन विचारले, की या तंबूत प्रवेश मिळवण्यासाठी कोण आपले प्राण देऊ शकेल? एक जण पुढे आला. त्याला घेऊन गुरू गोविंदसिंग तंबूत गेले.

थोड्या वेळात रक्ताने माखलेली तलवार घेऊन बाहेर आले. त्यांनी परत तोच प्रश्न विचारला व अशी कृती आणखी चार वेळा केली. काही वेळाने ते पाचही जण पगडी बांधून बाहेर आले.

त्या पाच लोकांना नंतर पाच पैर म्हटले जाऊ लागले. या दिवशी गुरूद्वारात जाऊन शीख बांधव प्रार्थना करतात. खालसा पंथाचा निर्माण दिवस म्हणूनही या दिवसाचे वेगळे महात्म्य आहे.

या दिवशी मिरवणूक काढली जाते. पंजाबमध्ये लोक पारंपारिक नृत्य, भांगडा करतात. संध्याकाळी शेकोटी पेटवितात व नवीन पेरण्या चांगल्या व्हाव्यात म्हणून प्रेरणा देतात. मुख्य समारंभ आनंदपुर साहिब येथे होतो.

सकाळी चार वाजता 'गुरू ग्रंथसाहिब'ला समारंभपूर्वक बाहेर आणले जाते. नंतर गादीवर बसविले जाते व मिरवणूक काढली जाते.