सोमवार, 26 जानेवारी 2026
  1. लाईफस्टाईल
  2. »
  3. खाद्य संस्कृती
  4. »
  5. चव दक्षिणेची
Written By वेबदुनिया|

इडली वडा मसाला

इडल्या भाज्या
साहित्य : 4 इडल्या बारीक काप केलेल्या, 1/2 वाटी भाज्या, 1 कांदा चिरलेला, आले, 1 हिरवी मिरची चिरलेली, 1/4 चमचा तिखट, धने पूड, हळद, एक लहान तुकडा कलमी, 1 लवंग, 2 वेलची, कोथिंबीर, पुदिन्याची पानं.

कृती : एका भांड्यात तेल गरम करून त्यात कलमी, लवंग व वेलदोडे टाकावे. नंतर त्यात चिरलेला कांदा टाकून सोनेरी होईपर्यंत
परतावा. व भाज्या घालून काही मिनिट शिजवावे. नंतर त्यात आलं, मीठ, तिखट, हळद व धने पूड टाकावी. नंतर त्यात इडलीचे तुकडे टाकावेत. आवडत असल्यास टोमॅटो टाकू शकता.