मंगळवार, 3 डिसेंबर 2024
  1. लाईफस्टाईल
  2. »
  3. खाद्य संस्कृती
  4. »
  5. चव दक्षिणेची
Written By वेबदुनिया|

चायनिज रोल

PR
साहित्य : एक पाकिट चायनिज नुडल्स, कोबी, गाजर, सिमला मिरची, कांद्याची पात, टोमॅटो केचअप, सोया सॉस, शेजवान सॉस, अजिनो मोटो, मैदा, तेल आणि चवीनुसार मीठ.

कृती : प्रथम एका भांडय़ात नुडल्स गरम पाण्यात उकळवून घ्यावेत. त्यात एक चमचा तेल घालून नंतर त्या चाळणीतून पाणी काढून घ्यावे. दुसऱ्या भांडय़ात तेल गरम करून त्यात कोबी, गाजर, कांद्याची पात, अजिनोमोटो एक चिमूट, एक चमचा टोमॅटो केचअप, एक चमचा शेजवान सॉस, आणि नुडल्स घालून चवीनुसार मीठ घालावे. (मीठ थोडे कमी घालावे कारण सोयासॉसमध्ये मीठ असते.) नंतर त्यात दोन चमचा मैदा घालून ते मिश्रण मळून घ्यावे. त्याचे रोल करून तेलात लालसर तळून घ्यावेत. सोयासॉस किंवा केचअप बरोबर सर्व्ह करावेत.