गुरूवार, 5 डिसेंबर 2024
  1. लाईफस्टाईल
  2. »
  3. खाद्य संस्कृती
  4. »
  5. चव दक्षिणेची
Written By वेबदुनिया|

चिंचेचा सार

साहित्य : 1 वाटी लहान पिकलेली चिंच, पाव वाटी गूळ, तिळाचा कूट पाव वाटी, अर्धा चमचा आले लसूण पेस्ट, लाल मिरची 2-3 तुकडे करून, फोडणीसाठी तेल व जिरं, कढीपत्ता व हिंग, मसाला अर्धा चमचा, तिखट, मीठ, हळद, अंदाजे.

कृती : 4 ते 5 तास आधी चिंच भिजत घालून कोळ काढून घ्या. अंदाजे पातळ होईल, एवढेच पाणी घाला, कढईत तेल व जिरं घालून फोडणी करा. लाल मिरची, कढीपत्ता व हिंग घाला, साराचे सारण घाला, तिळाचा कूट घाला. चवीनुसार तिखट, मीठ, हळद व मसाला घाला. आले
लसूण पेस्ट व गूळ घाला, साराला उकळी द्या. वरून कोथिंबीरने सजवा.