- लाईफस्टाईल
» - खाद्य संस्कृती
» - चव दक्षिणेची
पुरण व नारळाचे बॉल्स
साहित्य : 2 वाटी चणा डाळ, 2 वाटी ओल्या नारळाचा किस, 2 1/2 वाटी साखर, अर्धा चमचा वेलची पूड. कृती : सर्वप्रथम चणा डाळ शिजवून घ्यावी मग त्यात नारळाचा किस व साखर टाकून मिश्रण एकजीव करावे. ह्या मिश्रणाला घट्ट होईस्तोर शिजू द्यावे. वरून वेलची पूड घालावी. सारण तयार झाल्यावर त्याला थंड होऊ द्या. बॉल्ससाठी साहित्य : 2 वाटी मैदा, थोडंस मीठ, तेलाचे मोहन व पाव चमचा सोडा. मैदा चाळून त्यात थोड मीठ व तेलाचे मोहन घालून भज्याच्या पीठाप्रमाणे पातळ घोल करावा व त्यात थोडा सोडा घालून मिश्रणाला चांगले फेटावे. तयार सारणाचे लहान लहान बॉल्स करून त्या मिश्रणात बुडवून गरम तुपात तळून घ्या.