भरल्या कांद्याची भाजी
|
कृती : कांद्याचा वरचा व थोडा खालचा भाग व साल काढून चार फाकी होतील अशी चिरावीत. नंतर कोबर्याचा कीस, तीळ व शेंगदाणे, धने, जिरे हे सर्व कोरडे भाजून बारीक करावे. या कुटात चवीप्रमाणे मीठ, तिखट, गूळ, गोडा मसाला, थोडी हळद 1-2 चमचे तेल व चिंचेचे पाणी घालून बारीक वाटावे व हे सर्व मिश्रण कांद्याच्या चार फाकीमध्ये दाबून भरावे. कढईत फोडणी तयार करून त्यात भरलेले कांदे टाकावेत व मंद आचेवर ठेवून थोड्या वेळाने रस्स्याकरिता गरम पाणी टाकून उकळू द्यावे व साधारण नरम कांदे झाल्यावर त्यात कोथिंबीर व ओले खोबरे टाकावे. ही भाजी चवदार लागते.

