1. मराठी बातम्या
  2. खेळ मराठी
  3. क्रीडा वृत्त
Written By
Last Modified: नवी दिल्ली , रविवार, 17 जुलै 2016 (10:05 IST)

सुपर मिडलवेट विजेतेदावर विजेंदरसिंगचा कब्जा

भारताचा मुष्टियोद्धा विजेंदरसिंग याने शनिवारी डब्ल्यूबीओ आशिया पॅसिफिक सुपर मिडलवेट विजेतेपदाच्या लढतीत ऑस्ट्रेलियाच्या केरी होपवर मात केली. विजेंदरने व्यावसायिक बॉक्सिंग खेळायला सुरूवात केल्यापासून सर्व सहा सामने जिंकले होते. त्यामुळे तो केरी होपविरुद्धच्या सामन्यात सातत्य राखत विजय मिळवणार का, याकडे सगळ्यांचे लक्ष लागले होते. 
 
आंतरराष्ट्रीय पातळीवर केरी होप हा नावाजलेला आणि अनुभवी मुष्टियोद्धा म्हणून ओळखला जातो. होप हा माजी डब्ल्यूबीओ युरोपीय चॅम्पियन राहिला असून त्याच जिंकण्याचे आणि हारण्याचे प्रमाण 23:7 असे होते. त्यामुळे विजेंदरसिंगपुढे मोठे आव्हान होते. मात्र, विजेंदरने हे आव्हान लीलया परतावून लावले. विजेंदरने केरीवर 98-92, 98-92 आणि 100-90 अशी मात केली. या विजयानंतर विजेंदरने भारतवासियांचे आभार मानले आहेत. ही लढत दहाव्या फेरीपर्यंत जाईल असे मला वाटले नव्हते. हे माझे एकटय़ाचे यश नसून माझ्या संपूर्ण देशाचे यश आहे.