रविवार, 19 ऑक्टोबर 2025
  1. मराठी बातम्या
  2. खेळ मराठी
  3. क्रीडा वृत्त
Written By
Last Modified: शुक्रवार, 10 मार्च 2017 (11:37 IST)

गडचिरोलीची एंजल जागतिक विक्रमाची मानकरी

गडचिरोली
नागपूर- गडचिरोली येथील स्कूल ऑफ स्कॉलर्सची विद्यार्थिनी एंजल देवकुले वयाच्या 8 व्या वर्षीच आतापर्यंत राज्यस्तरीय व आंतरराष्ट्रीय स्तरावर उत्कृष्ट नैपूण्य दाखविल सलग आठ सुवर्ण पदक पटकावून जागतिक विक्रमाची मानकरी ठरली आहे.
 
विशेष म्हणजे सिकई मार्शल आर्ट स्पर्धेमध्ये जगातील सर्वात कमी वयाची एंजल सुवर्णपदक विजेती खेळाडू म्हणून तिने जागतिक विक्रम स्थापित केला आहे.
 
महाराष्ट्र सिकई असोसिएशनचे अध्यक्ष मझहर खान यांनी पत्रकार परिषदेत तिच्या अभूतपूर्व कामगिरीबाबत माहिती दिली. एंजल सलग दुसर्‍यांदा भारताची सर्वात कमी वयाची खेळाडू राहिली आहे. नुकत्याच काठमांडू येथे झालेल्या ट्रॉय नॅशनल आंतरराष्ट्रीय सिकई मार्शल आर्ट स्पर्धेत एंजलने दोन सुवर्णपदक पटकाविले असून एप्रिलमध्ये थायलंड येथील एशियन चॅम्पियनशिपमध्ये तिची निवड झालेली आहे. एंजल भारतीय संघाचे नेतृत्व करणारी सर्वात कमी वयाची खेळाडू आहे.