बुधवार, 25 डिसेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. खेळ मराठी
  3. क्रीडा वृत्त
Written By
Last Updated : सोमवार, 20 सप्टेंबर 2021 (13:23 IST)

डेव्हिस कप: रोहन बोपण्णा आणि रामकुमार रामनाथन दुहेरीचा सामनात पराभव, भारत फिनलँडकडून एकतर्फी हरला

रोहन बोपण्णा आणि रामकुमार रामनाथन या जोडीला 'करा किंवा मरा ' दुहेरी सामन्यात पराभव पत्करावा लागला कारण भारत जागतिक गटातील सामना शनिवारी येथे फिनलँडविरुद्ध हरला. कर्णधार रोहित राजपालने शेवटच्या क्षणी दुहेरीची जोडी बदलून बोपण्णाला दिवीज शरणऐवजी रामकुमारसह मैदानात उतरवले. पण याचाही भारताला फायदा झाला नाही आणि या महत्त्वपूर्ण सामन्यात बोपण्णा आणि रामकुमारच्या जोडीला हैनरी कॉन्टीनेन आणि हॅरी हेलियोवारा यांच्याकडून एक तास 38 मिनिटांमध्ये 6-7 6-7 असा पराभव पत्करावा लागला. अशाप्रकारे, फिनलँडने सामन्यात 3-0 अशी अपराजित आघाडी घेतली. प्रजनेश गुणेश्वरन आणि रामनाथन या दोघांनी शुक्रवारी एकेरीचे सामने गमावले, त्यामुळे भारतीयांना सामन्यात टिकून राहण्यासाठी दुहेरी सामना जिंकणे बाकी राहिले. आता रिव्हर्स एकेरीचे सामने क्षुल्लक झाले आहेत.
 
हेलियोवाराला कोर्टावरील चार खेळाडूंपैकी सर्वात कमकुवत मानले जात होते, परंतु त्याने आपला खेळ अनेक पटीने सुधारला आणि सामन्याच्या निकालावर परिणाम केला. दुसरीकडे, जेव्हा भारतीय जोडीने आघाडी घेतली होती, तेव्हा ती हरवली. दुसऱ्या सेटमध्ये त्याने आठ गेममध्ये चार ब्रेक पॉइंट गमावले. तर यातील विजयामुळे त्यांना यजमान जोडीवर दबाव आणण्याची संधी मिळाली असती. भारतीय जोडीने पहिल्या सेटमध्ये 3-3 बरोबरीनंतर हेलियोवाराच्या सर्व्हिसवर आक्रमकता दाखवली. पण रामकुमारच्या दुहेरी चुकीचा आणि नेटमधील व्हॉलीच्या चुकीचा फायदा घेत फिनलॅन्डच्या जोडीने सेट टायब्रेकरनंतर आपल्या नावावर केले.
 
दुसऱ्या सेटमध्येही बोपण्णाने वारंवार असह्ज चुकांमुळे आपली सर्व्हिस गमावली. फिनलँडच्या हलोवाराने पहिल्या मॅच पॉइंटला 5-2 ने चमकदार फोरहँडने आणि रामकुमारला पुढचा पॉइंट परत करण्यात अपयशी ठरल्याने फिनलँडने मॅचमध्ये 3-0 अशी अटळ आघाडी घेत टायब्रेकर गाठला.प्रजनेश ला शुक्रवारी एका खालच्या क्रमांकाच्या खेळाडूकडून पराभव पत्करावा लागला तर इतर एकेरीत रामकुमार रामनाथनलाही पराभवाचा सामना करावा लागला. झालेल्या सलामीच्या सामन्यात, जागतिक क्रमवारीत 165 व्या क्रमांकावर असलेल्या प्रजनेश ने एक तास आणि 25 मिनिटे चाललेल्या सामन्यात 3-6, 6-7 असा तळाचा क्रमांक मिळवलेला खेळाडू ओटो विर्तानेन (419 व्या क्रमांकावर) चा पराभव केला.
 
रामकुमार रामनाथन (187 व्या क्रमांकावर) दुसऱ्या सामन्यात फिनलॅंड नंबर एक खेळाडू एमिल रुसुवुओरीला कठीण आव्हान उभे केले, परंतु जागतिक क्रमवारीत 74 व्या क्रमांकाच्या खेळाडूकडून 4-6 5-7 ने पराभव पत्करावा लागला. भारताची चांगली बरोबरी होती, प्रजनेश ने खालच्या क्रमांकाचा खेळाडूशी  खेळला पण विर्तानेन ने सहज विजय मिळवला. रामकुमारने आपल्या प्रतिस्पर्ध्याच्या आव्हानावर मात करण्यासाठी काही प्रयत्न केले, पण तो भारताला बरोबरीवर आणू शकला नाही. प्रजनेशचा पराभव निराशाजनक होता, कारण त्याच्याकडे खूप कमी अनुभवी खेळाडू होता, त्याने आधी फक्त एक डेव्हिस कप सामना जिंकला होता.