शनिवार, 11 जानेवारी 2025
  1. मराठी बातम्या
  2. खेळ मराठी
  3. क्रीडा वृत्त
Written By
Last Modified: मंगळवार, 14 सप्टेंबर 2021 (10:53 IST)

राष्ट्रीय स्तरावरील नेमबाज नमनवीर बरार त्यांच्या घरात मृतावस्थेत आढळले

राष्ट्रीय स्तरावरील नेमबाज नमनवीर सिंग बरार सोमवारी मोहाली येथील त्यांच्या घरी मृतावस्थेत आढळले. पोलिसांनी आत्महत्या करण्याची शक्यता नाकारली नाही. मोहालीचे पोलीस उपनिरीक्षक यांनी फोनवर सांगितले की, 28 वर्षीय ट्रॅप शूटरच्या शरीरावर गोळ्यांच्या खुणा आहेत.डीएसपीने मात्र सांगितले की त्याने आत्महत्या केली की अपघाताने गोळी झाडली हे स्पष्टपणे सांगता येत नाही.
 
पोलीस उपनिरीक्षक म्हणाले की, 'आत्ता आम्ही स्पष्टपणे सांगू शकत नाही की ती आत्महत्या आहे की अपघाती शॉट. मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवण्यात आला असून अहवालाची प्रतीक्षा आहे. अहवाल बाहेर आल्यावर आम्हाला निष्कर्षावर येण्यास मदत होईल. शूटरच्या कुटुंबीयांनी पोलिसांना घटनेची माहिती दिली. बरार  मोहालीच्या सेक्टर 71 मधील त्यांच्या घरी मृतावस्थेत आढळले.
 
दक्षिण कोरियामध्ये झालेल्या वर्ल्ड युनिव्हर्सिटी गेम्सच्या डबल ट्रॅप नेमबाजी स्पर्धेत त्याने कांस्यपदक जिंकले. या वर्षी दिल्लीत ISSF विश्वचषक स्पर्धेत बरार ने किमान पात्रता गुण (MQS) प्रकारात भाग घेतला.