शुक्रवार, 3 जानेवारी 2025
  1. मराठी बातम्या
  2. खेळ मराठी
  3. क्रीडा वृत्त
Written By
Last Modified: दुबई , गुरूवार, 14 जानेवारी 2021 (14:07 IST)

अंकिता रैनाचा पराभव

अंकिता रैनाचे ग्रँडस्लॅम एकेरीतील मुख्य ड्रॉ मध्ये खेळण्याचे स्वप्न पुन्हा एकदा अपूर्ण राहिले आहे. कारण तिला ऑस्ट्रेलियन ओपनच्या क्वॉलिफाइंग टुर्नामेंटमध्ये अखेरच्या फेरीत सर्बियाच्या ओल्गा डा निलोविचकडून पराभूत व्हावे लागले.
 
दुबईमध्ये सुरू असलेल्या महिलांच्या एकेरी क्वॉलिफायर सामन्यात अंकिताला तिसर्याअ व अखेरच्या फेरीत  सर्बियाची खेळाडूने 2 तास चाललेल्या सामन्यात 6-2, 3-6, 6-1 ने पराभूत केले. अंकिताचा हा ग्रँडस्लॅमच्या मुख्य् फेरीत आपली जागा पक्की करण्याचा हा सहावा प्रयत्न होता. आता सत्रातील पहिल्या ग्रँडस्लॅमध्ये एकेरी गटात भारताच सर्व आशा केवळ सुमित नागलवर टिकून आहेत. त्याला पुरुषांच्या एकेरी गटात वाइल्ड कार्ड मिळाले आहे. रामकुमार रानाथन पुरुषांच्या एकेरी क्वॉलिफायरच्या पहिल्या फेरीत पराभूत झाला आहे. तर प्रज्ज्ञेश गुणेश्वरनला दुसर्या  फेरीत पराभूत व्हावे लागले.