मंगळवार, 24 डिसेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. आंतरराष्ट्रीय
Written By
Last Modified: मंगळवार, 10 नोव्हेंबर 2020 (07:31 IST)

वाचा, ट्रम्प यांच्या पराभवाविषयी आठवले काय म्हणतात

अमेरिकेच्या अध्यक्षपदाच्या निवडणुकीत रिपब्लिकन पक्षाचे उमेदवार आणि मावळते राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प विजयी व्हायला पाहिजे होते, मात्र त्यांनी पराभव मान्य करावा, असा सल्ला रिपब्लिकन पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष आणि केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले  यांनी केले आहे. 
 
“रिपब्लिकन पक्षाचे उमेदवार डोनाल्ड ट्रम्प अध्यक्षपदाच्या निवडणुकीत विजयी व्हायला हवे होते. मात्र या अटीतटीच्या निवडणुकीत जो बायडेन विजयी झाले. त्यांचे रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियातर्फे स्वागत. लोकशाहीचा कौल मावळते अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी स्वीकारला पाहिजे” असे आवाहन रामदास आठवले यांनी केले. यावेळी अमेरिकेच्या पहिल्या महिला उपाध्यक्ष म्हणून ऐतिहासिक विजय मिळवलेल्या कमला हॅरिस यांचेही रामदास आठवले यांनी अभिनंदन केले आहे.