suvichar

फिफा विश्‍वचषक स्पर्धा; पराभवामुळे विरला पहिल्या गोलचा आनंद

Updated: बुधवार, 11 ऑक्टोबर 2017 (09:56 IST)
 
अर्थात 17 वर्षांखालील फिफा विश्‍वचषक स्पर्धेतील या पराभवानंतरही भारतीय संघाची मान ताठ होती. त्यातही जीकसन सिंगने फिफा विश्‍वचषक स्पर्धेतील भारताचा पहिलावहिला गोल नोंदविल्यामुळे त्याच्यावर प्रकाशझोत होताच. परंतु भारताला या सामन्यात पराभव पत्करावा लागल्यामुळे ऐतिहासिक गोल करण्याचा आनंद विरला, अशी कबुली जीकसनने सामन्यानंतर दिली.
 
आमची या सामन्यात विजय मिळविण्याची क्षमता होती आणि पात्रताही. परंतु नशिबाने साथ न दिल्यामुळे आमचा विजय हुकला, असे सांगून जीकसन म्हणाला की, भारताने विजय मिळविला असता, तरच माझ्या गोलला अर्थ होता. अर्थात या पराभवातून आम्हाला मोठा धडा मिळाला आणि आंतरराष्ट्रीय फुटबॉलमध्ये पदार्पण करताना असे धडे आवश्‍यकच असतात. आम्ही यातून शिकून आमच्यात निश्‍चितच सुधारणा घडवून आणू.
 
मणिपूरमधील हावखा ममांग या खेड्यातील जीकसन हा रहिवासी. त्याच्या वडिलांना दोन वर्षांपूर्वी हृदयविकारामुळे मणिपूर पोलीस दलातील नोकरी सोडावी लागली. त्यानंतर आईने भाजीपाला विकून मिळविलेल्या तुटपुंज्या कमाईवर त्याच्या कुटुंबाची गुजराण होत होती. दरम्यान जीकसनला दोन वर्षांपूर्वी राष्ट्रीय निवड समितीने पसंती दिली नाही. परंतु या धक्‍क्‍यातून सावरून त्याने फिफा 17 वर्षांखालील भारतीय संघात स्थान मिळविण्यापर्यंत मजल मारलीच.
 
आता वरिष्ठ संघात स्थान मिळविण्याचे जीकसनचे स्वप्न आहे. काही झाले तरी फिफा विश्‍वचषक स्पर्धेत भारताचा पहिलावहिला गोल नोंदविणारा खेळाडू म्हणून इतिहासात त्याचे नाव अजरामर झाले आहेच.

सर्व पहा

आषाढी एकादशीच्या दिवशी 'या' ७ गोष्टी टाळाच; अन्यथा विठ्ठल पूजेचे फळ मिळणार नाही!

जळणाऱ्या नातेवाईकांपासून स्वतःचा बचाव कसा करावा? आचार्य चाणक्यांचे विचार जाणून घ्या

महाराष्ट्रातील सर्वात थंड गाव कोणतं? उत्तर ऐकून आश्चर्य वाटेल

वयाच्या ३५ नंतर मित्र अचानक कमी का होतात?

स्वयंपाकघरातील हा एक बदल वीजबिल कमी करू शकतो

सर्व पहा

नीट वादाच्या पार्श्वभूमीवर, प्रल्हाद जोशी नवे शिक्षणमंत्री झाले, महत्त्वपूर्ण विधान केले

मुंबई लोकल ट्रेनवर आता डिजिटल पद्धतीने देखरेख ठेवली जाईल

LIVE: ठाकरे बंधूंचा अभिनंदन मोर्चा आज शिवाजी पार्कपासून निघणार

पंढरपूर कॉरिडॉरमुळे विठ्ठल दर्शन अधिक सुलभ होईल, मुख्यमंत्री फडणवीस यांची घोषणा

धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्यावर संदेश देण्यासाठी ठाकरे बंधूंचा अभिनंदन मोर्चाआज शिवाजी पार्कपासून निघणार

पुढील लेख
Show comments