बुधवार, 25 डिसेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. खेळ मराठी
  3. क्रीडा वृत्त
Written By

दीपिका पल्लिकल उपांत्यपूर्व फेरीत

सॅनप्रान्सिको- भारताच्या दीपिका पल्लिकल कार्तिकने सॅन फ्रान्सिस्को खुल्या स्क्वॅश स्पर्धेत चौथ्या मानांिकत एमिली व्हिटलॉकला पराभवाचा धक्का देत शेवटच्या आठमध्ये स्थान मिळविले. दीपिकाने व्हिटलॉकवर 11-9, 11-8, 7-11, 11-8 अशी मात करून उपांत्यपूर्व फेरी गाठली.
 
इंग्लंडच्या व्हिटलॉकवरील मक्तेदारी कायम राखत दीपिकाने तिला चौथ्यांदा पराभूत केले आहे. पहिले दोन जिंकून दीपिका सहज विजय मिळविणार असे वायत असतानाच तिसर्‍या गेममध्ये व्हिटलॉकने जोरदार मुसंडी मारत हा गेम जिंकला. पण चौथ्या गेममध्ये दीपिकाने तिला फारशी संधी दिली नाही. जागतिक क्रमवारीत 21 व्या क्रमांकावर असणशरी दीपिका या स्पर्धेत सहभगाी झालेली एकमेव भारतीय आहे. तिची पुढील लढत अमेरिकेच्या ऑलिव्हिया ब्लॅचफोर्डशी होणार आहे.