शुक्रवार, 31 ऑक्टोबर 2025
  1. मराठी बातम्या
  2. खेळ मराठी
  3. क्रीडा वृत्त
Written By
Last Modified: नवी दिल्ली , शनिवार, 4 मार्च 2017 (10:16 IST)

ज्वाला गुट्टाने केले गुरमेहरचे समर्थन

jwala gutta
सध्या शहीज जवानाची मुलगी गुरमेहर कौरच्या ट्विटवरून देशभरात सुरू असलेला वाद थांबण्याचे नाव घेत नाही. दिल्ली विद्यापीठात आज एबीव्हिपीच्या विद्यार्थ्यांचा मोर्चा काढण्यात येत असताना दुसरीकडे प्रसिद्ध बॅडमिंटनपटू ज्वाला गुट्टाने गुरमेहर कौरचे समर्थन करत या वादात उडी मारली आहे. ज्वालाने गुरमेहरचे समर्थन करत म्हणाली की, ही दुखद घटना आहे की, जेव्हा कोणी शांतता ठेवावी असे बोलत असताना काही लोक फक्त पाकिस्तान शब्दाचा उल्लेख करत यावरून वाद उपस्थित करत आहेत. यापेक्षा अति दु:ख याचे वाटते की, काही खेळाडू याबाबत काही माहिती नसतानाही बोलत आहे.