testwebdunia1
testwebdunia0
testwebdunia2

टाटा ओपन महाराष्ट्र स्पर्धेत एकेरीत कार्लोविच आणि अँडरसनचा अंतिम फेरीत प्रवेश

ivo karlovic
पुणे| Last Modified शनिवार, 5 जानेवारी 2019 (12:51 IST)
टाटा ओपन महाराष्ट्र स्पर्धेत एकेरी गटात क्रोएशियाच्या इवो कार्लोविच याने स्टीव्ह दार्सिसचा टायब्रेकमध्ये 7-6(3), 4-6,
6-3 असा पराभव करून अंतिम फेरीत प्रवेश केला. श्री शिवछत्रपती क्रीडा संकुल, म्हाळुंगे बालेवाडी येथे सुरु असलेल्या या स्पर्धेत पहिल्या उपांत्य फेरीच्या लढतीत क्रोएशियाच्या इवो कार्लोविच याने बेलारूसच्या स्टीव्ह दार्सिस याचा 7-6(3), 4-6, 6-3 असा पराभव करून अंतिम फेरीत प्रवेश केला. 1तास 55मिनिटे झालेल्या संघर्षपूर्ण लढतीत पहिल्या सेटमध्ये दोन्ही खेळाडूंनी सुरुवातीला जोरदार खेळ केला व त्यामुळे सेट टायब्रेकमध्ये गेला. टायब्रेकमध्ये कार्लोविचने आपल्या बिनतोड सर्व्हिसच्या जोरावर 5-2अशा फरकाने आघाडी घेतली. त्यानंतर दार्सिसने 8व्या गेममध्ये केलेल्या डबल फॉल्टचा फायदा घेत कार्लोविचने त्याची सर्व्हिस भेदली व स्वतःची सर्व्हिस राखत हा सेट 7-6(7-3)असा जिंकला. दुसऱ्या सेटमध्ये दार्सिसने वरचढ खेळ करत हा सेट कार्लोविच विरुद्ध 6-4असा जिंकून बरोबरी साधली. तिसऱ्या व निर्णायक सेटमध्ये 2-1अशा स्थितीत सामना असताना कार्लोविचने दार्सिसची सर्व्हिस ब्रेक केली व या सेटमध्ये आपले वर्चस्व कायम ठेवत हा सेट 6-3असा जिंकून अंतिम फेरीत आपले स्थान निश्चित केले. काल उशिरा संपलेल्या सामन्यात मागच्या वर्षीचा उपविजेता केविन अँडरसन (दक्षिण आफ्रिका) ने गतविजेता गिल्स सिमोन (फ्रान्स) ला ६-३, ७-६ सरळ सेट्स मध्ये हरवून अंतिम सामन्यात प्रवेश केला. मागच्या वर्षी अंतिम सामन्यात सिमोन ने अँडरसन ला पराभूत करून टाटा ओपन महाराष्ट्राचा खिताब पटकावला होता
स्पर्धेचा सविस्तर निकाल: एकेरी गट: उपांत्य फेरी:
इवो कार्लोविच(क्रोएशिया)वि.वि. स्टीव्ह दार्सिस(बेलारूस) 7-6(3), 4-6, 6-3.
केविन अँडरसन(दक्षिण आफ्रिका) वि.वि. गिल्स सिमोन (फ्रान्स) ६-३, ७-६

अभिजित देशमुख


यावर अधिक वाचा :

Maruti Suzuki ने दिवाळी अगोदर आपल्या ग्राहकांना दिली भेट, ...

Maruti Suzuki ने दिवाळी अगोदर आपल्या ग्राहकांना दिली भेट, 5000 रुपयांपर्यंत स्वस्त केल्या कारी
देशातील सर्वात मोठी कार निर्माता कंपनी मारुती सुजुकीने आपल्या ग्राहकांना दिवाळीच्या अगोदर ...

Whatsapp चे आहे हे लेटेस्ट फीचर्स, नुकतेच झाले लाँच

Whatsapp चे आहे हे लेटेस्ट फीचर्स, नुकतेच झाले लाँच
मेसेजिंग सर्विस Whatsapp ने मागच्या काही महिन्यात बरेच शानदार फीचर्स लाँच केले आहे. ...

ब्रेक्झिट: बोरिस जॉन्सन यांचा ब्रिटिश संसद स्थगितीचा निर्णय ...

ब्रेक्झिट: बोरिस जॉन्सन यांचा ब्रिटिश संसद स्थगितीचा निर्णय बेकायदेशीर - सुप्रीम कोर्ट
ब्रिटनचे पंतप्रधान बोरिस जॉन्सन यांनी ब्रिटिश संसद स्थगित करण्याचा निर्णय चुकीचा होता, ...

पंतप्रधान नरेंद्र मोदी ‘फादर ऑफ इंडिया’ – डोनाल्ड ट्रम्प

पंतप्रधान नरेंद्र मोदी ‘फादर ऑफ इंडिया’ – डोनाल्ड ट्रम्प
भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी हे एक महान नेते आहेत. तसेच एक सभ्य आणि चांगले व्यक्ती ...

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा ‘ग्लोबल गोलकीपर्स’ पुरस्काराने ...

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा ‘ग्लोबल गोलकीपर्स’ पुरस्काराने सन्मान
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा बिल अँड मिलिंडा गेट्‌स फाऊंडेशन च्या प्रतिष्ठित अशा ग्लोबल ...

नारायण राणे अखेर भाजप मध्ये, पक्ष देखील केला विलीन

नारायण राणे अखेर भाजप मध्ये, पक्ष देखील केला विलीन
महाराष्ट्र स्वाभिमान पक्षाचे विलीनीकरण आणि कार्यकरत्यांचा भाजपा प्रवेश अखेर आज ...

विधानसभा निवडणूक: बाबासाहेब आंबेडकरांचं इंदू मिलमधलं स्मारक ...

विधानसभा निवडणूक: बाबासाहेब आंबेडकरांचं इंदू मिलमधलं स्मारक 2020पर्यंत पूर्ण होणार का?
"इंदू मिलच्या जागेवरचं डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचं स्मारक 2020 पर्यंत पूर्ण केलं जाईल. ...

काश्मीर : मोबाईल सेवा सुरू, पण नागरिकांमध्ये मात्र नाराजी, ...

काश्मीर : मोबाईल सेवा सुरू, पण नागरिकांमध्ये मात्र नाराजी, कारण...
काश्मीरमध्ये तब्बल अडीच महिन्यांनंतर सोमवारी दुपारी 12 वाजता मोबाईल सेवा सुरु करण्यात ...

व्होडाफोनची सर्वात खास ऑफर रोलआऊट, वापरकर्त्यांना 130GB ...

व्होडाफोनची सर्वात खास ऑफर रोलआऊट, वापरकर्त्यांना 130GB पेक्षा जास्त डेटा मिळेल
प्रीपेड आणि पोस्टपेड रिचार्ज योजनांसंदर्भात भारताच्या टेलिकॉम मार्केटमध्ये बरीच स्पर्धा ...

एमआयएम फॅक्टर औरंगाबादमध्ये यंदा चालणार का? : विधानसभा ...

एमआयएम फॅक्टर औरंगाबादमध्ये यंदा चालणार का? : विधानसभा निवडणूक
महाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2019 च्या लक्षवेधी लढतींमध्ये औरंगाबादमधल्या लढती ...