बाळासाहेब ठाकरे यांच्यापेक्षा दुसरा मोठा कुणी स्टार नाही
शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या जीवनावर आधारित ‘ठाकरे’ चित्रपटाशी आपला चित्रपट क्लॅश होऊ नये, असे निर्मात्यांना वाटते. महाराष्ट्रात बाळासाहेब ठाकरे यांच्यापेक्षा दुसरा मोठा कुणी स्टार नाही. त्यामुळे काही चित्रपटांचे प्रदर्शन पुढे ढकलण्यात आले आहे आणि ते योग्यच असल्याचे मत आघाडीचा अभिनेता आमीर खान याने व्यक्त केले आहे.
लठ्ठपणा या आजाराविषयी वेबसाईटचे उद्घाटन करण्यासाठी तो मंत्रालयात आला होता. त्यावेळी प्रत्येक निर्मात्याला आपला चित्रपट चांगल्या दिवशी प्रदर्शित व्हावा, असेच वाटत असते. मला वाटते महाराष्ट्रात बाळासाहेबांपेक्षा कोणीही मोठा स्टार नाही. त्यामुळे या दिवशी अन्य कोणाही निर्मात्याला आपला चित्रपट क्लॅश करावासा वाटणार नाही. बाळासाहेबांवरील चित्रपट महाराष्ट्रातील प्रत्येकालाच पहावासा वाटणार, हे साहजिकच असल्याचे त्याने सांगितले.