गुरूवार, 14 ऑगस्ट 2025
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. राष्ट्रीय
Written By
Last Modified: शनिवार, 5 जानेवारी 2019 (09:46 IST)

धनंजय महाडिक, सुनील तटकरे यांची उमेदवारी निश्चित ?

Dhananjay Mahadik
लोकसभा निवडणुकीसाठी शरद पवार यांनी मुंबईत बैठक घेऊन कोल्हापूरमध्ये धनंजय महाडिक तर रायगडमध्ये सुनील तटकरे यांना उमेदवारी देण्याचे निश्‍चित केले आहे. सातारा मतदारसंघातील उमेदवारीबाबत राष्ट्रवादीने आपला सस्पेन्स कायम ठेवला असून खा. उदयनराजेंना उमेदवारी देणार की नाही, याबाबत शरद पवारांनी नेहमीप्रमाणे सावध भूमिका ठेवली आहे. माढ्याच्या जागेबाबतही पेच वाढला असून विजयसिंह मोहिते-पाटील की प्रभाकर देशमुख, याविषयी चुरस सुरू आहे. 
 
कोल्हापूरमध्ये माजी मंत्री हसन मुश्रीफ तर रायगडमध्ये भास्कर जाधव यांनी अखेरच्या क्षणापर्यंत उमेदवारीसाठी आटोकाट प्रयत्न केले. अखेरीस मुश्रीफ व जाधव यांना विधानसभा निवडणुकीत मदत करण्याच्या आश्‍वासनानंतर महाडिक व तटकरे यांची नावे निश्‍चित झाल्याचे समजते.