1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. लोकप्रिय
Written By
Last Modified: शुक्रवार, 4 जानेवारी 2019 (14:14 IST)

सावध राहा! काय आपण देखील प्लास्टिक आधार कार्ड वापरता?

अनेक ठिकाणी आधार कार्ड आवश्यक असतो, परंतु आपण प्लास्टिक कार्ड वापरत असाल तर सावधगिरी बाळगा. जर आपण आपला अधार कार्ड लॅमिनेट करवून ठेवला असेल किंवा प्लास्टिक स्मार्ट कार्ड म्हणून वापरत असाल तर सावधगिरी बाळगा. यूनिक आइडेंटिफिकेशन अथॉरिटी ऑफ इंडिया (UIDAI) ने प्लास्टिक आधार कार्ड वर चिंता व्यक्त केली आहे. 
 
UIDAI नुसार आधार कार्डचे लेमिनेशन करवण्यामुळे त्याचे क्यूआर कोड काम करणे थांबतो. यामुळे आपली खाजगी माहितीही चोरी होऊ शकते. UIDAI ने म्हटले की प्लास्टिक आधार कार्ड वापरल्याने डेटा लीक होण्याची शक्यताही राहते. UIDAI नुसार लोकांनी साध्या कागदावर आधार डाउनलोड करावा किंवा mAadhaar चा वापर केला पाहिजे. UIDAI नुसार मूळ पत्र, त्याचा कटअवे पोर्शन, साध्या कागदावर डाउनलोड केलेली आवृत्ती आणि mAadhaar पूर्णपणे वैध आहे. 
 
UIDAI नुसार प्लास्टिक किंवा पीवीसी आधार स्मार्ट कार्ड्स नेहमी अनावश्यक असतात. याचे कारण असे की क्विक रेस्पॉन्स कोड सहसा काम करणे बंद करून देतात.  या प्रकारे अनधिकृत छपाईमुळे क्यूआर कोड काम करणे बंद करू शकतो.