लक्ष्य सेन इंडोनेशिया मास्टर्समधून बाहेर, निशिमोटो कडून पराभव
Badminton: भारताचा स्टार बॅडमिंटनपटू लक्ष्य सेनचा आंतरराष्ट्रीय स्तरावर संघर्ष सुरूच असून गुरुवारी येथे बॅडमिंटन स्पर्धेच्या दुसऱ्या फेरीत जपानच्या केंटा निशिमोटोकडून पराभूत होऊन तो इंडोनेशिया मास्टर्स सुपर 500 बॅडमिंटन स्पर्धेतून बाहेर पडला.
भारताचा 10वा मानांकित खेळाडू लक्ष्य निशिमोटोकडून 16-21, 21-12, 21-23 असा पराभूत झाला. याआधी ध्रुव कपिला आणि तनिषा क्रास्टो या मिश्र दुहेरीच्या जोडीलाही दुसऱ्या फेरीत पराभवाला सामोरे जावे लागले होते. आघाडी घेतल्यानंतरही भारतीय जोडीला मलेशियन जोडी पँग रॉन हू आणि सु यिन चेंगकडून 21-18, 15-21, 19-21 असा पराभव स्वीकारावा लागला.
आशियाई क्रीडा स्पर्धेतील रौप्यपदक विजेता आणि राष्ट्रकुल स्पर्धेतील सुवर्णपदक विजेत्या सेनची सामन्याची सुरुवात खराब झाली आणि पहिला गेम गमावला. त्यांनी दुसरा गेम जिंकून चांगले पुनरागमन केले पण तिसऱ्या आणि निर्णायक गेममध्ये खडतर आव्हान सादर करूनही त्यांना पराभवाचा सामना करावा लागला.
Edited By - Priya Dixit