शनिवार, 25 जानेवारी 2025
  1. लाईफस्टाईल
  2. बाल मैफल
  3. बालकथा
Written By
Last Modified: शुक्रवार, 24 जानेवारी 2025 (20:30 IST)

नैतिक कथा : मांजरीच्या गळ्यातल्या घंटाची कहाणी

Kids story a
Kids story : अनेक वर्षांपूर्वीची गोष्ट आहे. एका मोठ्या घरामध्ये शंभर उंदीर राहायचे. ते आपले पोट भरण्यासाठी संपूर्ण दिवस फिरत असायचे. एक दिवस अचानक त्यांच्या घरात एक मोठी मांजर शिकार करण्यासाठी आली. मांजरीला पाहताच सर्व उंदीर आपापल्या बिळात लपून गेले. मांजरीने पहिले की, या घरात खूप उंदीर आहे. तिने तिथेच राहायचे ठरवले. आता मांजर तिथेच राहायला लागली. आता तिला भूक लागली की, ती अंधारात कापायची व उंदीर बाहेर आला की, त्याच्यावर झडप घालायची आणि त्याला खाऊन टाकायची.
आता रोज असे व्हायला लागले त्यामुळे उंदरांची संख्या हळूहळू कमी व्हायला लागली. या समस्येवर उपाय शोधण्यासाठी सर्व उंदीर एकत्र जमले व एक सभा आयोजित केली.सभेमध्ये सर्व उंदीर उपस्थित होते. सर्वांनी वेगवगेळ्या प्रकारचे उपाय सांगितले. जेणेकरून मांजरीला थांबवता येईल व सर्व उंदीर सुरक्षित राहतील. पण कोणाचाही उपाय असा न्हवता की, मांजरीचा सामना करता येईल. आता अचानक एका वृद्ध उंदराने एक सल्ला दिला. तो म्हणाला की आपण मंजिरापासून स्वतःचे रक्षण करू शकतो. पण त्याकरिता एक घंटी आणि एक दोरीची गरज पडेल. वृद्ध उंदीर म्हणाला की आपण मांजरीच्या गळ्यात घंटा बांधू आणि जेव्हा ती येईल तेव्हा घंटा वाजल्याने आपल्याला धोक्याची माहिती मिळेल. धोका जाणवल्यानंतर, आपण पळून जाऊ आणि आपल्या बिळात लपू.

यामुळे आपण मांजरीचे शिकार होण्यापासून वाचू. सर्व उंदीर आनंद साजरा करत होते तेव्हा अचानक एक अनुभवी उंदीर उभा राहिला. तो सर्व उंदरांना जोरात म्हणाला, गप्प राहा, तुम्ही सगळे मूर्ख आहात. त्यानंतर, अनुभवी उंदराने जे सांगितले ते ऐकून सर्वांना धक्का बसला. उंदीर म्हणाला ते ठीक आहे, पण जोपर्यंत मांजरीच्या गळ्यात घंटा बांधली जात नाही तोपर्यंत आपण सुरक्षित नाही. आता तुम्ही सर्वांनी आधी मला सांगा की मांजरीच्या गळ्यात घंटा कोण बांधणार? सर्व उंदीर एकमेकांकडे पाहू लागले. बैठकीत शांतता होती. सर्व उंदीर निराश झाले. मांजरीचा आवाज ऐकून सर्व उंदीर पळून गेले आणि आपापल्या बिळात लपले.
तात्पर्य : केवळ योजना बनवून तुम्ही यशस्वी होत नाही.
अस्वीकरण (Disclaimer) : या लेखात दिलेली माहिती आणि उपाय सामान्य माहितीवर आधारित आहे.या माहितीचीपूर्णता, विश्वासार्हता आणि अचूकता याबाबत वेबदुनिया कोणतीही हमी देत ​​नाही. अधिक माहितीसाठी संबंधित तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा.


Edited By- Dhanashri Naik