शुक्रवार, 8 ऑगस्ट 2025
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. पुणे
Written By
Last Modified: शुक्रवार, 24 जानेवारी 2025 (20:35 IST)

पुण्यात डंपरखाली अडकून दोन तरुणींचा दुर्दैवी अंत

Vadjai Nagar Corner on Hinjewadi-Maan Road
पुण्यातील हिंजवडी-माण रस्त्यावर वडजाई नगर कॉर्नर येथे रेडीमिक्स डंपर पलटी होऊन त्यात अडकून दोन तरुणींचा दुर्दैवी अंत झाल्याची घटना घडली आहे. 

रेडीमिक्सने भरलेला डंपर हिंजवडीतून महाळुंगेच्या दिशेला चालला होता.वडजाई नगर कॉर्नर येथे वळण घेतांना चालकाचा वाहनावरील ताबा सुटला आणि डंपर पलटी झाला. त्याच वेळी स्कुटरवर दोन तरुणी डम्परच्या खाली अडकल्या त्यांचा जागीच मृत्यु झाला. सायंकाळी पांच वाजेच्या सुमारास ही घटना घडली आहे.  
घटनेनंतर परिसरात गोंधळ उडाला.अपघाताची माहिती मिळताच घटनास्थळी  हिंजवडी पोलिसांनी, वाहतूक पोलिसांनी आणि अग्निशामक दलाने धाव घेतली आणि क्रेनच्या सहाय्याने डंपर उचलून दोघींचे मृतदेह बाहेर काढले.या वेळी मोठी वाहतूक कोंडी झाली. मृतदेहांची ओळख पटवण्याचे काम सुरु आहे. 
या दोघी तरुणी आयटी अभियंता असल्याचा प्राथमिक अंदाज व्यक्त केला जात आहे. या दोघी दुचाकीवरून जात असताना हा अपघात घडला. पोलिस पुढील तपास करत आहे. 
Edited By - Priya Dixit