Canada vs Morocco : कॅनडाला ३-० ने हरवून मोरोक्को उपांत्यपूर्व फेरीत
फिफा विश्वचषक २०२६ च्या १६ संघांच्या फेरीतील सामन्यात मोरोक्कोने कॅनडाला ३-० ने पराभूत करून शानदार पद्धतीने उपांत्यपूर्व फेरीत प्रवेश केला. पहिल्या सत्रात दोन्ही संघांनी एकही गोल केला नाही, पण दुसऱ्या सत्रात मोरोक्कोने पूर्णपणे वर्चस्व गाजवले.
स्टार मिडफिल्डर अझेडिन ओनाहीने ५०व्या आणि ८२व्या मिनिटाला दोन गोल करून विजयाचा पाया रचला. त्यानंतर, अतिरिक्त वेळेत (९०+८ मिनिटाला) सौफियान रहिमीने तिसरा गोल करून कॅनडाचा पराभव निश्चित केला. या प्रभावी विजयामुळे मोरोक्कोने विजेतेपदासाठीची आपली दावेदारी आणखी मजबूत केली, तर कॅनडाचा विश्वचषक प्रवास १६ संघांच्या फेरीतच संपुष्टात आला.
मोरोक्कोने विजयाच्या दिशेने जोरदार पाऊल टाकले आहे. ८४ व्या मिनिटापर्यंत मोरोक्कोने कॅनडावर २-० अशी आघाडी घेतली आहे. स्टार मिडफिल्डर अझेडिन ओनाहीने ५० व्या मिनिटाला पहिला गोल केला आणि त्यानंतर ८२ व्या मिनिटाला आपला दुसरा गोल करून कॅनडाच्या पुनरागमनाच्या आशांना मोठा धक्का दिला.
Edited By - Priya Dixit

