नीरज आज दोहा डायमंड लीगमध्ये दाखवणार आपले कौशल्य,भारतीय खेळाडूंचे वेळापत्रक जाणून घ्या
दोन वेळा ऑलिंपिक पदक विजेता भालाफेकपटू नीरज चोप्रा आजपासून डायमंड लीग मोहिमेला सुरुवात करणार आहे. या स्पर्धेत चांगली कामगिरी केल्यास या वर्षाच्या अखेरीस होणाऱ्या जागतिक अजिंक्यपद स्पर्धेत विजेतेपद राखण्याचे त्यांचे लक्ष्य असेल. भारतीयांची संख्या मोठी असल्याने, नीरजला दोहामध्ये भरपूर पाठिंबा मिळण्याची अपेक्षा आहे.
नीरजचा सामना दोन वेळा विश्वविजेता आणि 2024ऑलिंपिक कांस्यपदक विजेता ग्रेनाडाचा अँडरसन पीटर्स, चेक प्रजासत्ताकचा जाकुब वडलेच, जर्मनीचा ज्युलियन वेबर आणि मॅक्स डेहनिंग, केनियाचा ज्युलियस येगो आणि जपानचा रॉडरिक गेन्की डीन यांच्याशी होईल. हे सर्वजण मोठ्या स्पर्धांमध्ये नीरजचे प्रतिस्पर्धी राहिले आहेत. नीरज व्यतिरिक्त, डायमंड लीगचे राष्ट्रीय विक्रमधारक गुलवीर सिंग आणि पारुल चौधरी अनुक्रमे पुरुष आणि महिलांच्या 5000 आणि 3000 मीटर स्टीपलचेसमध्ये भाग घेतील.
दोहा डायमंड लीग 2025मध्ये नीरज चोप्राची भालाफेक स्पर्धा दोहा येथील कतार स्पोर्ट्स क्लब अरेना येथे होणार आहे.नीरज चोप्राचा भालाफेक सामना शुक्रवार,16 मे रोजी भारतीय वेळेनुसार रात्री 10:13 वाजता सुरू होईल.
दोहा डायमंड लीग 2025 मधील भारतीय खेळाडूंचे वेळापत्रक
रात्री 10:13 - पुरूषांचा भालाफेक (नीरज चोप्रा आणि किशोर जेना)
रात्री 10:15 - पुरुषांची 5000 मीटर शर्यत (गुलवीर सिंग)
रात्री 11:14 - महिला 3000 मीटर स्टीपलचेस (पारुल चौधरी)
Edited By - Priya Dixit