बुधवार, 24 एप्रिल 2024
  1. मराठी बातम्या
  2. खेळ मराठी
  3. क्रीडा वृत्त
Written By

सचिन तेंडुलकर पीबीएल संघात भागीदार

बंगलोर- महान क्रिकेटर सचिन तेंडुलकर यांनी गुरुवारी बॅडमिंटनच्या दुनियेत पाऊल टाकत प्रीमियर बॅडमिंटन लीग फ्रँचाईजी बंगलोर ब्लास्टर्स यात भागीदारी मिळवली, ज्यात टालीवूड अभिनेता चिरंजीवीही भागीदार आहे.
 
टीमचे सह मालक आणि व्यवसायी निम्मागड्डा प्रसाद यांनी सांगितले की सचिन, चिरंजीवी, अकीनेनी नागार्जुन आणि अलु अरविंद व्यतिरिक्त आम्ही सर्वांनी एक ग्रुप तयार करून बंगलोर ब्लास्टर्समध्ये निवेश केले. ग्रुपद्वारे हे दुसरे निवेश आहे जे की इंडियन सुपर लीग फुटबॉल टूर्नामेंटची टीम केरला ब्लास्टर्सचेही मालक आहेत.
निवेशच्या भागीदारीचे टक्के उघडकीस आले असून योग्यवेळी याबद्दल माहिती पुरवली जाईल असे प्रसाद यांनी सांगितले.
 
तेंडुलकरची टीमचे सह मालक रूपात उपस्थितीबद्दल विचारल्यावर राष्ट्रीय कोच पुलेला गोपीचंद यांनी म्हटले की या महान फलंदाजाची उपस्थितीने खेळाडूंचे मनोबल तर वाढेलच, दर्शकही याकडे आकर्षित होतील.
 
तेंडुलकरने म्हटले की वैश्विक स्तरावर भारताला मिळत असलेले यश बघत ही वेळ खेळाच्या विकासासाठी महत्त्वाची आहे. मी बंगलोर ब्लास्टर्सचा भागीदार बनून उत्साहित आहे आणि आगामी सत्रासाठी आपल्या शुभेच्छा देतो.