शुक्रवार, 19 एप्रिल 2024
  1. मराठी बातम्या
  2. खेळ मराठी
  3. क्रीडा वृत्त
Written By

सायनाची हरियाणामध्ये बॅडमिंटन अकादमी

चंडीगढ- भारताची स्टार बॅडमिंटनपटू सायना नेहवाल हरियाणाच्या खेळाडूंना बॅडमिंटनच डावपेच अकादमीद्वारे शि‍कविणार आहे. अकादामी सुरू करण्यासाठी हरियाणा राज्य सरकाराने तिला गुरूग्राम येथील मानसेरमध्ये जमीन उपलब्ध करून देण्याचे आश्वासन दिले आहे.
 
गुरूग्राममध्ये होणार्‍या प्रवासी भारतीय दिवस कार्यक्रमादरम्यान याची औप‍चारिक घोषणा होऊ शकते. मूळची हरियाणाची सायना सध्या हैदराबाद येथे परिवारासह वास्तव्यास आहे. तिचा जन्म हिसार येथे झाला तर तिचे वडील डॉ हरबीर सिंग हरियाणा कृषी विश्वविद्यालय, हिसार येथे वैज्ञानिक म्हणून कार्यरत होते.
 
गुरूग्राममध्ये 10 ते 12 जानेवारीमध्ये होणार्‍या प्रवासी भारतीय दिवसाच्या कार्यक्रमाची तयारी करण्यासाठी हरियाणाचे राज्यपाल हैदराबाद येथे आले होते.