गुरूवार, 7 ऑगस्ट 2025
  1. मराठी बातम्या
  2. खेळ मराठी
  3. क्रीडा वृत्त
Written By
Last Modified: शनिवार, 7 जानेवारी 2023 (10:52 IST)

sania Mirza Retirement: सानिया मिर्झाने निवृत्ती जाहीर केली

sania Mirza
sania Mirza Retirement: टेनिस स्टार आणि चॅम्पियन सानिया मिर्झा, जिने टेनिसला भारतात ऐतिहासिक टप्प्यावर नेले आहे, तिने तिच्या व्यावसायिक कारकिर्दीला अलविदा करण्याचे ठरवले आहे. सानियाने तिच्या व्यावसायिक टेनिस कारकिर्दीतून निवृत्ती जाहीर केली आहे. ती पुढील महिन्यात दुबई टेनिस चॅम्पियनशिपमध्ये खेळणार असून, हा तिचा शेवटचा चॅम्पियनशिप खेळ असेल. दुबई टेनिस चॅम्पियनशिप, 19 फेब्रुवारीपासून सुरू होणार्‍या WTA 1000 स्पर्धेनंतर टेनिसमधून निवृत्ती घेणार असल्याचे माजी दुहेरीतील नंबर वन सानिया मिर्झाने एका मुलाखतीत सांगितले आहे.
 
गेल्या वर्षीच ती निवृत्त होणार होती, पण सानिया काही काळापासून दुखापतीने त्रस्त होती, त्यामुळे ती कोणत्याही स्पर्धेत सहभागी होऊ शकली नाही. त्यामुळेच तिच्या निवृत्तीची योजना बदलली.
 
 सानियाने भारतासाठी 6 ग्रँड स्लॅम जिंकले आहेत.
Edited by : Smita Joshi