शुक्रवार, 26 सप्टेंबर 2025
  1. मराठी बातम्या
  2. खेळ मराठी
  3. क्रीडा वृत्त
Written By
Last Modified: रविवार, 30 एप्रिल 2017 (22:16 IST)

प्रो कबड्डी लीगची प्रसिद्ध अँकर सोनिका चौहानचे निधन

sonika chouhan
मॉडेल, अभिनेत्री तसेच प्रो कबड्डी लीगची  अँकर  सोनिका चौहानचे रस्ते अपघातात निधन झाले. कोलकाताच्या लेक मॉलजवळ पहाटे चारच्या सुमारास हा भीषण अपघात झाला. अपघात झाला त्यावेळी सोनिकासोबत तिचा मित्र विक्रम चॅटर्जी होता. त्यांच्या टोयोटा कोरोला कारने रस्त्यावरील दुभाजकाला जोरदार धडक देऊन गाडी फुटपाथवर चढली. गाडीच्या धडकेच्या आवाजाने आसपासच्या नागरीकांनी अपघातस्थळी धाव घेऊन दोघांना गाडीबाहेर काढले. सोनिका आणि विक्रम दोघांना जवळच्या रुग्णालयात नेले. पण  डॉक्टरांनी सोनिकाला मृत घोषित केले.  सोनिका मिस इंडियाच्या अंतिम फेरीत पोहोचली होती.