सैयदा महापाराने अशक्य गोष्ट केली
कराची- पाकिस्तान आणि तेथे महिला फुटबॉलपटू ती ही सौंदर्यवती ही अशक्य वाटणारी गोष्ट सैयदा महापारा या पाकिस्तानी फुटबॉलपटूने खरी ठरविली असून तिचे अनेक फोटो सोशल मीडियावर झळकत आहेत.
दुबईच्या रॉसोनरी फुटबॉल लिगमध्ये खेळण्यासाठी तिला निमंत्रण दिले गेले व सध्या ती या लीगकडून खेळते आहे. पाकिस्तानात महिला खेळाडूंची स्थिती फारशी बरी नाही. मुलींना खेळायला मिळणे अवघड त्याही फुटबॉलचा खेळ म्हणजे पाहायला नको. तीही परवानगी मिळालीच तर बुरखा घालून खेळण्याची सक्ती होते. सैयदालाही या सर्व अडचणी आल्या.
अनेकदा तिच्यावर घाणेरड्या कॉमेंटही केल्या गेल्या मात्र सैयदाने ही सर्व बंधने झुगारून खेळणे सुरू ठेवले आहे. तिचे संपूर्ण नाव सैयदा महापारा शाहिद बुखारी असे आहे व ती संघाची गोलकीपर आहे.