शनिवार, 9 नोव्हेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. खेळ मराठी
  3. क्रीडा वृत्त
Written By
Last Modified: सोमवार, 9 ऑगस्ट 2021 (14:24 IST)

गल्फच्या बिजनेसमैनने जाहीर केले -श्रीजेशला एक कोटी रुपयांचे बक्षीस दिले जाईल

गल्फ देशांमध्ये राहणाऱ्या भारतीय वंशाच्या व्यावसायिकाने टोकियो ऑलिम्पिकमध्ये कांस्यपदक जिंकणाऱ्या भारतीय पुरुष हॉकी संघाचा गोलरक्षक पीआर श्रीजेशला एक कोटी रुपयांचे बक्षीस जाहीर केले आहे. भारतीय पुरुष हॉकी संघाने 41वर्षानंतर ऑलिम्पिकमध्ये पदक पटकावले असून भारताच्या विजयात गोलरक्षक श्रीजेशचा मोठा हात होता. 
 
कांस्यपदकासाठी खेळल्या गेलेल्या सामन्यात भारतीय पुरुष हॉकी संघाने जर्मनीचा 5-4 असा पराभव केला. जर्मनीला शेवटच्या क्षणात पेनल्टी कॉर्नर मिळाला, ज्यावर त्यांना बरोबरी साधण्याची संधी होती, पण श्रीजेशने शानदार सेव्ह करून भारताला हा ऐतिहासिक विजय मिळवून दिला.
 
व्हीपीएस हेल्थकेअरचे अध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालक म्हणाले, "आम्ही त्यांच्या योगदानाचे कौतुक करतो आणि त्यांच्यासाठी एक कोटी रुपयांचे रोख बक्षीस जाहीर करताना आम्हाला आनंद होत आहे." भारतीय पुरुष आणि महिला हॉकी संघ आज संध्याकाळी 5:15 वाजता टोकियोहून दिल्लीच्या इंदिरा गांधी आंतरराष्ट्रीय विमानतळावर उतरतील. भारताने एक सुवर्ण,दोन रौप्य आणि चार कांस्यपदकांसह गुणतालिकेत 48 वे स्थान मिळवले. ऑलिम्पिकमध्ये भारताची ही सर्वोत्तम कामगिरी आहे.यापूर्वी लंडन ऑलिम्पिकमध्ये भारताने एकूण सहा पदके (दोन रौप्य आणि चार कांस्य) जिंकली होती.
 
भारताचा भालाफेकपटू नीरज चोप्राने सुवर्णपदक पटकावले, जेअॅथलेटिक्स मधील भारताचे पहिले ऑलिम्पिक पदक आहे. भारतासाठी वेटलिफ्टर मीराबाई चानू आणि कुस्तीपटू रवी दहिया यांनी रौप्य पदक पटकावले तर पुरुष हॉकी संघ, कुस्तीपटू बजरंग पुनिया, बॅडमिंटनपटू पीव्ही सिंधू आणि महिला बॉक्सर लोव्हलिना बोर्गोहेन यांनी कांस्यपदके जिंकली.