बुधवार, 1 जानेवारी 2025
  1. मराठी बातम्या
  2. खेळ मराठी
  3. क्रीडा वृत्त
Written By
Last Modified: शुक्रवार, 3 सप्टेंबर 2021 (10:59 IST)

Tokyo Paralympics: प्रवीण कुमारने हाय जंप मध्ये नवीन आशियाई विक्रमासह रौप्य पदक जिंकले

टोकियो पॅरालिम्पिकमध्ये भारतीय खेळाडूंचे वर्चस्व कायम आहे. प्रवीण कुमारने उंच उडी स्पर्धेत देशाला सहावे रौप्य पदक मिळवून दिले आहे. प्रवीणने 2.07 मीटर लांब उडी घेऊन रौप्य पदक पटकावले. या उंच उडीसह प्रवीणने नवीन आशियाई विक्रमही केला. प्रवीण संपूर्ण सामन्यात उत्कृष्ट फॉर्मात होते, पण शेवटच्या क्षणात पोलॅंड खेळाडू जोनाथनने त्याच्यावर दाब टाकून 2.10 मीटर उडी घेऊन सुवर्ण पदक जिंकले. पॅरालिम्पिकमधील भारताचे हे 11 वे पदक आहे.
 
अंतिम सामन्यात प्रवीणची पोलंडच्या जीबीआर जोनाथनशी दमदार लढत झाली आणि सुवर्णपदकासाठी दोघांमध्ये कडा संघर्ष दिसला. प्रवीण पोलंड च्या  खेळाडूला झुंज देत होते,पण जोनाथनच्या 2.10 मीटरच्या लांब उडीशी तो जुळू शकला नाही आणि त्याला रौप्य पदकावर समाधान मानावे लागले. उंच उडीमध्ये भारताचे हे तिसरे पदक आहे.या पूर्वी  मारीअप्पन थंगावेलू आणि शरद कुमार यांनी रौप्य आणि कांस्यपदके जिंकली आहे. भारताने आतापर्यंत टोकियो पॅरालिम्पिकमध्ये 2 सुवर्ण, 6 रौप्य आणि 3 कांस्य अशी 11 पदके जिंकली आहेत.

रौप्य पदक जिंकल्यावर पंतप्रधान नरेंद्र मोदींनी प्रवीणला ट्विट करून त्यांच्या यशाबद्दल अभिनंदन केले. पंतप्रधानांनी लिहिले, प्रवीण आपल्यावर पॅरालिम्पिकमध्ये रौप्य पदक जिंकल्याबद्दल अभिमान आहे.हे पदक त्यांच्या मेहनतीचे आणि समर्पणाचे फळ आहे.आपले अनेक अभिनंदन.आपल्याला भविष्यासाठी शुभेच्छा. पॅरालिम्पिकमधील भारताची ही आतापर्यंतची सर्वोत्तम कामगिरी आहे.