स्पेनच्या 14व्या मानांकित गार्बिन मुगुरुझाने जर्मनीच्या अग्रमानांकित अँजेलिक कर्बरला पराभऊत करताना विम्बल्डन टेनिस स्पर्धेतील महिला एकेरीत खळबळजनक निकालाची नोंद केली. या विजयामुळे मुगुरुझाने उपान्त्य फेरीत धडक मारली. मुगुरुझाने पहिला सेट गमावल्यानंतर झुंजार पुनरागमन करताना कर्बरचे आव्हान 4-6, 6-4, 6-4 असे सुमारे पावणेदोन तासांत संपुष्टात आणले. याबरोबरच अमेरिकेची दहावी मानांकित...