शनिवार, 11 जानेवारी 2025
  1. मराठी बातम्या
  2. खेळ मराठी
  3. क्रीडा वृत्त
Written By
Last Modified: बुधवार, 15 मार्च 2023 (08:03 IST)

सांगलीत रंगणार महिलांची ‘महाराष्ट्र केसरी’

पुणे : महाराष्ट्र राज्य कुस्तीगीर परिषदेच्या मान्यतेने आणि सांगली जिल्हा व शहर तालीम संघाच्या वतीने पहिली महिलांची पहिली वहिली महाराष्ट्र केसरी स्पर्धा सांगली येथे आयोजित करण्यात आल्याची माहिती महाराष्ट्र राज्य कुस्तीगीर परिषदेचे महासचिव बाळासाहेब लांडगे, अर्जुन पुरस्कार विजेते काका पवार आणि शहर कुस्तीगीर संघाचे अध्यक्ष अमोल बराटे यांनी माहिती   दिली.
 
यासंदर्भात अधिक माहिती देताना ते म्हणाले, ही स्पर्धा सांगली येथे दि 23 आणि 24 मार्च रोजी होणार असून, फक्त मॅटवरच सामने होतील. दहा वजनी गटासह खुल्या गटांतील महिला कुस्तीपटू यात सहभागी होतील. स्पर्धेत 50, 53, 55, 57, 59, 62, 68, 72 आणि 76 किलो वजनी गटातील मल्ल सहभागी होणार आहेत. महाराष्ट्र केसरी साठी 65 किलो वजनी गटावरील मल्ल किताबासाठी लढणार आहेत. या स्पर्धेत 45 जिल्हय़ांचे संघ सहभागी होणार असून, महाराष्ट्र केसरी विजेत्याला चांदीची गदा देण्यात येणार आहे.
या स्पर्धेबरोबर कोल्हापूर येथे 25 आणि 26 मार्च रोजी कुमार गटाच्या राज्य अजिंक्यपद कुस्ती स्पर्धा होणार आहे. तर वरिष्ठ गटाच्या राज्यस्तरीय ग्रीको रोमन कुस्ती स्पर्धा 27 व 28 मार्च रोजी कै. मामासाहेब मोहोळ कुस्ती केंद्र येथे अमोल बुचडे आणि अमोल बराटे यांच्या वतीने आयोजित करण्यात आल्याचेही लांडगे यांनी सांगितले.
 Edited by : Ratnadeep Ranshoor