शनिवार, 25 जानेवारी 2025
  1. मराठी बातम्या
  2. खेळ मराठी
  3. क्रीडा वृत्त
Written By
Last Modified: बुधवार, 24 मे 2023 (07:03 IST)

World Table Tennis: जी साथियान उपांत्यपूर्व फेरीत, मनिका आणि शरथसह जिंकला

जी साथियानने जागतिक टेबल टेनिस चॅम्पियनशिपच्या पुरुष आणि मिश्र दुहेरीच्या अंतिम-16 मध्ये प्रवेश केला. त्याने पुरुष दुहेरीत शरथ कमल आणि मिश्र दुहेरीत मनिका बत्रा यांच्यासोबत जोडी केली. मात्र, एकेरीत शरथ कमल आणि राष्ट्रीय विजेती श्रीजा अकुला यांचे आव्हान दुसऱ्या फेरीत संपुष्टात आले.
 
शरथ -साथीयान याने हंगरीच्या बेन्स माजोरोस आणि डेन्मार्कच्या एंडर्स लिंदचा 11-5, 11-4, 15-13 असा पराभव झाला. त्यानंतर सथियानने मनिकासोबत जोडीने ब्राझीलच्या एरिक जोती आणि लुकाकुमहारा यांचा 8-11, 11-7, 11-6, 11-6 असा पराभव करत उपउपांत्यपूर्व फेरीत प्रवेश केला. 

जागतिक क्रमांक 56 शरथ ला दुसऱ्या फेरीत 33 व्या क्रमांकाच्या कोरियन ली सांग सुचा  
11-4, 13-11, 11-8, 12-10 असा पराभव केला. श्रीजाचा जागतिक क्रमवारीत १०व्या क्रमांकावर असलेल्या जर्मनीच्या यिंग हानने 11-2, 11-4, 11-2, 11-4  असा पराभव केला.
 
Edited by - Priya Dixit