1. मनोरंजन
  2. बॉलीवूड
  3. फिल्लमबाजी
Written By
Last Modified: गुरूवार, 1 ऑगस्ट 2024 (12:48 IST)

सहा नावांनी ओळखल्या जायच्या मीना कुमारी

Bollywood News
आपल्या गंभीर अभिनयाने चाहत्यांच्या मनात राज्य करणाऱ्या अदाकारी मीना कुमारी त्यांच्या रील लाईफमध्ये  'ट्रेजडी क्वीन' नावाने प्रसिद्ध होत्या. पण खऱ्या आयुष्यात त्या सहा नावांनी ओळखल्या जायच्या. मुंबईमध्ये 1 ऑगस्ट 1932 ला एका मध्यमवर्गीय मुस्लिम कुटुंबामध्ये मीना कुमारी यांचा जन्म झाला. त्यांच्या आई-वडिलांनी त्यांचे नाव 'माहजबी' ठेवले होते.
 
मीना कुमारी लहान असतांना त्यांचे डोळे खूप छोटे होते. त्यामुळे त्यांना सर्व चिनी म्हणून हाक मारायचे. वयाच्या चौथ्या वर्षी त्यांनी अभियानक्षेत्रात पाऊल टाकले. चित्रपट लेदरफेस मध्ये त्यांचे नाव बेबी मीना ठेवण्यात आले होते.  
 
मीना कुमारी यांना चित्रपटांसोबत शेरो-शायरी करण्याचा छंद होता. याकरिता त्या नाज या उपनावाचा उपयोग करायचा. मीना कुमारी यांचे पती त्यांना प्रेमाने मंजू म्हणून बोलावयाचे. आपल्या सुंदर अभिनयाने चाहत्यांच्या मनात राज्य करणाऱ्या मीना कुमारी 31 मार्च 1972 ला अनंतात विलीन झाल्या.