1. धर्म
  2. हिंदू
  3. आरती संग्रह
Written By
Last Updated : सोमवार, 31 मार्च 2025 (08:05 IST)

स्वामी समर्थ आरती Swami Samarth Aarti

जय जय सद्गुरु स्वामी समर्था
जय जय सद्गुरु स्वामी समर्था, 
आरती करु गुरुवर्या रे।
अगाध महिमा तव चरणांचा,
वर्णाया मति दे यारे।।धृ।।
 
अक्कलकोटी वास करुनिया, 
दाविली अघटीत चर्या रे ।
लीलापाशे बध्द करुनिया, 
तोडिले भव भया रे ।। 1 ।।
 
यवने पुशिले स्वामी कहॉ हे ? 
अक्कलकोटी पहा रे ।
समाधिसुख ते भोगुनी बोले, 
धन्य स्वामी वर्या रे ।। 2 ।।
 
जाणिसी मनिचे सर्व समर्था, 
विनवू किती भवहरा रे ।
इतुके देई दीन दयाळा, 
नच तव पद अंतरा रे ।। 3 ।।