बुधवार, 8 जानेवारी 2025
  1. लाईफस्टाईल
  2. »
  3. आरोग्य
  4. »
  5. स्वाइन फ्लू
Written By अभिनय कुलकर्णी|

धावणारी मुंबई आज मंदावली

एरवी कधीही न थांबणारी मुंबई स्वाईन फ्ल्यूच्या पार्श्वभूमीवरही आपल्या लौकीकाला जागली असली तरीही भीतीने एखाद्या 'स्लो लोकल' सारखी धावत होती. शाळा-कॉलेजेस बंद असल्यामुळे या भागात शुकशुकाट होता, तर जीवनरेखा असलेल्या रेल्वेगाड्यातही फारशी गर्दी नव्हती.

शाळा बंद असल्याने खासगी वाहने रस्त्यावर फार कमी दिसत होती. मुंबईबरोबरच ठाण्यातही शिक्षणसंस्था बंद आहेत. १९ ऑगस्टपर्यंत सुटी असल्याने पंधरा ऑगस्टच्या कार्यक्रमातही मुले भाग घेऊ शकणार नाहीत. दहीहंडी उत्सवही साधेपणाने साजरा करण्याचा निर्णय मंडळांनी घेतला आहे. त्याचवेळी आगामी गणेशोत्सवालाही साधेपणाचीच झालर असेल. मल्टिप्लेक्स आणि टॉकीजेस बंद असल्यानेही या परिसरात शुकशकाट होता.